श्रीवर्धन प्रतिनिधी - तेजस ठाकूर
पृथ्वीच्या निर्मितीपासून सजीवांच्या अनेक जाती निर्माण झाल्या. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाचा एक भाग आपूसकच पूर्ण होत होता, पण कालांतराने अनेक सजीव प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच निसर्ग जीवनाच्या अन्नसाखळीमध्ये बहूमोलाचा वाटा हा गिधाडांना दिला जातो. त्याप्रमाणेच ही निसर्गाची साखळी तुटू नये ह्या उद्देशातून श्रीवर्धन मधल्या प्राणी मित्रांनी गेल्या आठ दिवसात तीन गिधाडांचे प्राण वाचवले. व श्रीवर्धन वनविभाग खात्याकडे सुपूर्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही गिधाडे चार ते पाच महिन्याचे असल्या कारणाने त्यांना हवेत झेप घेता येत नाही. त्यामुळे एक गिधाड रस्त्याच्या कडेला खाली पडलेली दिसून आल्यास तिथून जाणारे प्राणी मित्र गणेश कुडगावकर यांनी त्या गिधाडास घेऊन तात्काळ वनविभागात धाव घेतली. त्याच सोबत दुसरे गिधाड समुद्रकिनारी एका झाडावर बसले होते अचानक त्यांने झेप घेतल्याने काही मिनिटातच समुद्राच्या पाण्यात पडल्याचे शैलेंद्र ठाकूर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पाण्यातून बाहेर काढून जवळच्या झाडीत ठेवले. परंतु बराच वेळ निघून गेल्याने देखील त्याला उडता येत नसल्याचे लक्षात घेता श्रीवर्धन वनखात्यात दाखल केले.
या अगोदर श्रीवर्धनमध्ये विविध जातीचे सर्प, घोरपड, मगर, गिधाड असे अनेक प्रकारचे प्राणी व पक्षी वन खात्यात दाखल करण्यात आले आहेत.
ह्या वेळी प्राणी मित्रांमध्ये गणेश कुडगावकर, प्रथम केळस्कर, शैलेंद्र ठाकूर, हर्ष राऊत, शैलेश केळस्कर यांनी वनखात्याचे अधिकारी राऊत व भाऊसाहेब गायकवाड व इतर सहकारी यांच्या हाती संबंधित गिधाड सुपुर्त करण्यात आले.
सध्या दुर्मिळ होत चाललेली गिधाडांची प्रजात संवर्धन करण्याची गरज भासत आहे. ज्याप्रमाणे वाघाचे अस्तित्व कमी होत आहे त्याप्रमाणे गिधाडांची प्रजात नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सध्या चालू असलेल्या मे महिन्यात पाण्याची डबके, घराच्या वरती वाटीत पाणी ठेवणे हे करण्यास विसरू नये. जेणेकरून पाण्याअभावी कोणत्याही प्राणी व पक्ष्यांचे मरण होईल. - गणेश कुडगावकर (प्राणी मित्र)
गिधाड संवर्धन काळाची गरज लक्षात घेता जर कोणाला कुठे कोणताही पक्षी जखमी आढळून आल्यास त्यांना दगड किंवा काठी न मारता जवळच्या वन विभागात दाखल करावे. जेणेकरून गिधाडांची किंवा इतर कोणतेही पक्षांची नष्ट होणारी प्रजात आपल्याला थांबवता येईल. - शैलेंद्र ठाकूर (प्राणी मित्र)
Post a Comment