म्हसळा तालुक्यांत कोरोना + पैकी २ रुग्ण बरे तर नव्याने कोरोना + ३ रुग्ण वाढले.
होम आयसोलेशनचा आभ्यास होणे गरजेचे
संजय खांबेटे : म्हसळा
निर्सगाची जवळीक आसलेल्या म्हसळ्या तील ग्रामिण भागाला कोरोना आता त्रास देऊलागल्याने तालुक्यात भीतीचे वातावर ण निर्माण झाले आहे.आजपर्यंत म्हसळ्यां त कोरोना बाधीतांची एकूण संख्या ४१९ झाली आहे.आज३जण कोरोना बाधीत झाले तर उपचार घेणाऱ्यांपैकी केवळ दोनच रुग्ण बरे झाले. बाधीतांपैकी खामगाव येथील २ तर म्हसळा येथील एक आहे. ३३ कोरोना बाधीत उपचार घेत असून त्यापैकी २२बाधीत Home Isolation उर्वरीत ११बाधीतां पैकी ७ उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन,३ खाजगी रुग्णालय,१जण जिल्हा रुग्णालय रत्नागिरी किंवा अलिबाग येथे आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी म्हसळा यानी कळविले आहे.
"घरीच क्वारंटाईन किंवा Home Isolation असणा-या नागरिकांच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी 'कोव्हिगार्ड' मोबाईल ॲपचा प्रभावी वापर व्हावा याव्दारे नागरिकांच्या प्रकृतीची आरोग्य विभागाच्या डॉक्टरांकडून दररोज नियमित विचारपूस करणे व डेटा ठेवणे आवश्यक आहे.कोरोना बाधीत रुग्णाना नागरिकांनाही डॉक्टरांना काही सांगावयाचे असल्यास आरोग्य विभागांत सुविधा असणे आवश्यक आहे."
Post a Comment