म्हसळयाचे हवामान तापले : पंखे थांबले, नागरिक हवालदिल



संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यांत आज पहाटेपासून आभ्राछादीत आकाश,वाढते उष्णतामान व सकाळपासून विज प्रवाह खंडीत झाल्याने घरांतील पंखे बंद त्यामुळे उन्हाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे बुधवारी (२८ एप्रिल) ला जनता गरम्यामुळे हवालदील झाली होती.आज म्हसळ्यातील किमान तपमान २८ अंश सेल्सियसदरम्यान तर कमाल ३४अंश सेल्सियसदरम्यान होते, हवेतील आद्रता ६२% होते. वातावरणा तील या बदलामुळे सकाळी नऊपासूनच उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात होत आहे. दुपारी ११ ते चार या दरम्यान उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे चटके अधिक तीव्रतेने जाणवतात. त्यातच आज सकाळ पासून मान्सून पूर्व दुरुस्ती -देखभालीसाठी म.रा.वि.वितरण कंपनीने शहरांतील विज पुरवठा खंडीत केल्याने घरांतील पंखे बंद त्यामुळे बहुतांश मंडळी घामाघूम झाली होती. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा