श्रीवर्धन :- तेजस ठाकूर
श्रीवर्धन शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी लसीकरणासाठी लावली हजेरी. प्राप्त माहितीनुसार दररोज ६० ते ७० नागरिक लसीकरण घेत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सध्या लसीकरण करण्याचे ठिकाण श्रीवर्धन नगरपरिषद शाळा क्रमांक १ मध्ये करण्यात येत आहे. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय मध्ये सद्यस्थितीत एकूण ३१ रुग्ण उपचार घेत आहेत.
श्रीवर्धन शहरात पोलिसांच्या कडक कारवाईमुळे सकाळी ११ नंतर औषधांचे दुकान वगळता इतर सर्व दुकाने पूर्णतः बंद असतात. प्रत्येक नाक्यावर पोलिसांचे बंदोबस्त असल्या कारणाने खाजगी वाहनांची दरवळ बंद दिसते.
सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून पाहता दि. २८/०४/२०२१ पर्यंत श्रीवर्धन तालुक्यातील ५६५ व्यक्ती बरे होऊन घरी परतलेले आहेत व ७६ कोरोना बाधितांवर रुग्णांवर पुढील उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आजच्या दिवशी १२ रुग्ण बरे झाले आहेत.
४५ वर्षाच्या सर्व व्यक्तींनी लसीकरण करुन घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आटोक्यात येण्यास मदत होईल. भारतात बनवलेले कोव्हाक्सीन असो किंवा कोविडशिल्ड असो दोन्ही लस सुरक्षित आहेत. कोरोना महामारीच्या लढ्यात आपल्याला शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन व सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून कोरोनावर मात करता येईल. घनश्याम गायकवाड (नागरिक)
आजच्या लसीकरनासाठी प्रचंड गर्दी असल्यामुळे श्रीवर्धनच्या नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसण्यात आला आहे. आज गेले ४ दिवस लसीकरण नगरपरिषदेच्या शाळा क्र १ मध्ये असून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून चांगला निर्णय घेण्यात आला आहे. काशिनाथ गुरव (नागरिक)
Post a Comment