kovid-19 लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे गट विकास अधिकारी वाय.एम. प्रभे यांचे आवाहन.



म्हसळा -अशोक काते

भारत देशात आणि महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर मात करण्यासाठी आणि कोरोनाला हरवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण करणे होय.शासनाने उपलब्ध केलेल्या लसीच्या साठ्या नुसार तालुक्यातील नागरिकांनी नेमुन दिलेल्या लसीकरण केंद्रावर जाण्या अगोदरच शासन संकेत स्थळावर लसीकरण करणाऱ्या लाभार्थ्यांनी त्यांचे नाव,मोबाईल नंबर,आधारकार्ड लिंक केल्यास योग्य वेळी लस टोचुन घेण्यास मदतीचे होणार असल्याचे म्हसळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी माहिती दिली आहे.त्यांनी शासन संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी या बाबत नमूद करताना
https://selfregistration.cowin.gov.in/
या लिंक वर क्लीक करावे.
मोबाईल नंबर रजिस्टर करून त्यावर आलेला OTP नोंदवावा.आपला आधार क्रमांक नोंदवुन Gender(लिंग) सिलेक्ट करावे तसेच जन्म वर्ष टाकुन
वरील सर्व माहिती रजिस्टर करावी.पिन कोड टाकुन त्यानुसार आलेल्या तारखेला लसीकरण schedule करावे. नंतर आपणांस 2 मेसेजेस येतील त्यातील पहिला मेसेज रेफरन्स ld लसीकरण केंद्रावर दाखवायचा आहे तर दुसरा मेसेज कोणत्या तारखेला लसीकरणासाठी जायचे आहे असणार आहे. अशाप्रकारे कोव्हीड-19 लसीकरणासाठी नोंदणी केल्यास लस वेळेत घेण्यास मदतीचे होणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी प्रभे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा