संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात आज केवळ ४जण कोरोना +(बाधीत) , बधीतांमध्ये रोहीणी यार्ड, खामगाव गौळवाडी, म्हसळा व मेंदडी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे तर ५ जण बरे झाले असल्याचे तहसीलदार शरद गोसावी यानी प्रसीद्धी पत्रकांत सांगीतले. तालुक्यात एकूण बाधीत४१६ आहेत,३२ बाधीत रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यातील २० रुग्णानी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला, उर्वरीत ८ उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन, ३ प्रायव्हेट रुग्णालय व १ जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे उपचार घेत असल्याचे प्रसिद्धी पत्रकांत म्हटले आहे. आज पर्यंत तालुक्यातील तब्बल३६७ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत मृतांची एकूण संख्या १७ आहे.आज चिखलप येथील ७० वर्षीय बाधीत (पु) मयत झाल्याचे सांगण्यात आले.तालुक्याचा मृत्यू दर ४.०८ तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.२२ आहे.
Post a Comment