श्रीवर्धनचे सौंदर्य पुन्हा प्रस्थापितच्या वाटेवर


 श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर

         सौंदर्य हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो कोकणाचा निसर्गरम्य वातावरण. आंबे, फणस, काजू, नारळ व सुपारी यांच्या उत्पादनासाठी कोकण हे प्रसिद्ध ठिकाण मानले जाते. अशाच कोकणातली श्रीवर्धन गावची कहाणी.
          ३ जून रोजी झालेल्या चक्रीवादळामध्ये अनेक झाडांची व घरांचे नुकसान झाले, परंतु श्रीवर्धन शहर आता हिरवेगार पानांनी भरून आलेला दिसतो. काही ठिकाणी मोठमोठी वडाची झाडे व इतर झाडे पडल्याचे दिसून आल्याने मनात खंत निर्माण होते. परंतु श्रीवर्धनकरांनी आपापल्या जागेमध्ये नवनवीन झाडांची लागवड केलेली दिसून येते.
         श्रीवर्धनची प्रसिद्ध असलेली रोठा सुपारी या वर्षी फार कमी प्रमाणात उत्पादन झाली असे नागरिकांकडून ऐकण्यात येते. श्रीवर्धन शहर हे पर्यटकांसाठी प्रसिद्ध ठिकाण असून संचारबंदीच्या कारणाने पर्यटकांची ये-जा दिसत नाही. श्रीवर्धन शहराला निसर्गाने देणगी दिलेला समुद्रकिनारा लाभला असून, आज मौन धारण केलेल्या अवस्थेत दिसण्यात येतो.
         श्रीवर्धनची ग्रामदेवता असलेली आई सोमजाई मातेचे मंदिर श्रीवर्धनची शोभा वाढवते. त्यासोबत प्राचीन काळातले लक्ष्मीनारायण मंदिर व शिव शंकराचे मंदिर श्रीवर्धनचे सौंदर्य वाढविण्यात मदत करते. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची जन्मभूमी अशीही श्रीवर्धनची ओळख करण्यात येते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा