(म्हसळा प्रतिनिधी)
लस तुटवड्याचे भितीने राज्यांत लसीकरण केंद्रावर गोंधळ सुरु असतानाच म्हसळा तालुक्यातील मेंदडी प्रा.आ.केंद्रात झालेल्या सभापती सावंत यांच्या राजकीय हस्तक्षेपा नंतर कोव्हीड लसीकरण केंद्रावर राजकीय हस्तक्षेप नसावाअशी मागणी शेकाप पुरोगामी संघटनेचे म्हसळा तालुका अध्यक्ष निलेश मांदाडकर यानी केली. म्हसळा तालुक्यातील प्रा.आ.केंद्र, मेंदडी (२००) व ग्रामिण रुग्णालय म्हसळा (२७०) डोस उपलब्ध आसल्याने दोनही केंद्रावर आज शुक्रवार दि.३० रोजी लसीकरण सुरू रहाणार आहे.मेंदडी येथील लसीकरण केंद्रावर सभापती श्रीमती सावंत यानी केलेल्या हस्तक्षेपामुळे सनदशीर मार्गाने लस घेणाऱ्या मंडळीना मनस्ताप झाला या तक्रारीमुळे आता १८ते ४४ वयोगटातील लसीकरणावेळी राजकीय अथवा स्थानिकां चा त्रास अथवा हस्तक्षेप होणार नाही. प्रसंगावधानाने केलेल्या तक्रारीमुळे निलेश मांदाडकर यांचे तालुक्यात व जिल्ह्यांतील विविध स्तरावरून स्वागत व कौतुक होत आहे.
"१मे पासून जिल्ह्यांत लसीकरण केंद्रांवर १८ते ४४ वयोगटातील लसीकरण व्यापक स्वरुपांत आसल्याने लसीकरणाचे वेळेत पोलीस बंदोबस्त राहाणार आहे"
उध्दव सुर्वे,स.पो.नी.पोलीस स्टेशन,म्हसळा
Post a Comment