संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यांत शहराचे बरोबरीने ग्रामि- भागात रोज १/२कोव्हीड पॉझीटीव्ह रुग्ण आढळत आहेत. कोव्हीड पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आसल्याने जाणका राना चिंता वाटत आहे.तालुक्यात आज पर्यंत बाधीतांची संख्या ४२१, आजचे बाधीत २, उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ३४, आजपर्यंत मृत्यू पावलेले एकूण १७, आजपर्यंत बरे झालेल्याची संख्या ३७० आहे. आज ४४ (पु)वर्षीय आंबेत येथील १ रुग्ण बरा झाला तर आज ४५ वर्षीय(स्त्रि) खामगाव व म्हसळा येथील ४२वर्षीय( स्त्रि) असे दोघे कोव्हीड पॉझीटीव्ह आढळले, उपचार घेत असलेल्या३४ रुग्णा रुग्णांपैकी २१ जण घरीच विलगीकरण होऊन उपचार घेत आहेत तर ७ श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय, २ माणगाव उपजिल्हा रुग्णालय, १ अलिबाग किंवा रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तर ३ खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यानी कळविले आहे. तालुक्यात घरीच विलगीकरण(Home Isolation)चे प्रमाण६१.७६ % आहे.
"विलगीकरणातील व्यक्तीने चौदा दिवस घरातील एका खोलीत स्वत:ला अक्षरश: कोंडून घेतले पाहिजे. घरातील अन्य व्यक्तींच्या संपर्कात त्याने येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे, परंतु हा नियम पाळला जात नाही".
Post a Comment