माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल : आदिवासी महिलेवर बलात्कार आरोपी मुन्ना पठाण यास जन्मठेपेची शिक्षा


संजय खांबेटे : म्हसळा 
  सदरची घटना म्हसळा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पाभरे तांबडी,घोणसे म्हशाची वाडी या गावचे हद्दींत डिसेंबर २०१५ ते दि.३/१२/२०१७ चे दरम्यान घडली.
  सदर घटनेची हकीगत अशी की, यातील पिडीत फिर्यादी व तिची पिडीत बहिण हे आदिवासी समाजाचे असून आरोपी युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाण (रा.पाभरे) याचेकडे आंब्याच्या बागेमध्ये राखणी करच्या कामावर होत्या आरोपीत याने फिर्यादी हिस मारहाण करून तिच्या मुलाला व आजीला मारून टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने  वेळोवेळी पाभरे तांबडी,घोणसे म्हशाची वाडी येथे शारिरीक संबंध प्रस्थापित केले, त्यातून ती गरोदर राहीली असताना तिचा गर्भपात घडवून आणला. तसेच आरोपी युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाण (रा.पाभरे) याने  फिर्यादीच्या लहान बहीणी सोबत लैंगिक अत्याचार केले.
   सदर घटनेची फिर्याद कॉ.गु.र.नं.५८/ २०१७ भा.द.वि.क.३७६(२) (आय)(के) (एन),३२३,५०६,३१२ सह अ.जा.अ.  जमाती कायदा कलम३(१),(एच),(२)(व्हि) (२ )(व्हिए) व पोक्सो कलम ४,५(एल) (एन), ६ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास श्री.बापूराव पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन यानी केला व वरील आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी मा.विशेष न्यायालय, माणगाव रायगड येथे झाली. सदर केसमध्ये मा.न्यायालयासमोर पिडीत मुलींची व वैद्यकिय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर खटल्यामध्ये सहा. सरकारी वकील श्री.योगेश तेंडुलकर व श्री.जे.डी. म्हात्रे अति.शासकिय अभियोक्ता यानी सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासले.
श्री.योगेश तेंडुलकर अति. शासकिय अभियोक्ता यानी मा.न्यायालयासमोर प्रभावीपणे युक्तीवाद केला,मा.उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे न्याय निर्णय दाखल केले, पैरवी अधिकारी श्री.घुमास्कर, श्री.कासार व महिला पैरवी अधिकारी सौ.कोपनार, गोविलकर, ढाकणे, गोळे यानी मदत केली, विशेष न्यायाधीश सोा पी.पी.बनकर माणगाव रायगड यानी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीतीनंतर आरोपी युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाण (रा.पाभरे) यास दोषी ठखून आज शुक्रवार दि.३०/४/ २०२१ रोजी भा.द.वि.क.३७६(२) (के) (एन) अन्वये १४ वर्ष व रुपये एक लाख दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सक्त मजुरी भा.द.वि.क५०६अन्वये १ वर्ष , अँट्रासिटी अँक्ट३(२) (५) अन्वये जन्मठेप व रु १० ,००० दंड व दंड न भरल्यास १ महिना सक्त मजुरी शिक्षा सुनावली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा