तळा (किशोर पितळे) कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र प्रशासनाने दि.१५ एप्रिल पासून राज्यात कडक निर्बंध,संचारबंदी व १४४ कलम लागू केले आहेत.त्या पार्श्वभूमीवर तळा बाजारपेठेत गुरुवारी संचारबंदीमुळे शुकशुकाट पहायला मिळाले.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी'ब्रेक दि चैन ' कोविड रूग्णांची साखळी तोडण्यासाठी दि.१४ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे २०२१ पर्यंत कडक निर्बंध, संचारबंदी व १४४ कलम लागू केेले आहे.तळा बाजारपेठ लहान असून तालुक्याची एकच मुख्य बाजारपेठ आहे.अत्यावश्यक सेवा सोडली तर ईतर सर्वदुकानेबंदठेवण्यातआलीआहेत.पोलिसांकडून बाजारपेठ परिसरात सतत गस्त घालून विनाकारण बाजारात फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.तसेच लॉकडाऊनमुळे बस स्थानकातील अनेक बस देखील रद्द करण्यात आल्या आहेत.अँपे, रिक्षा व मिनिडोअर यांना देखील फक्त आपत्कालीन सुविधा देण्यास सांगितले असल्याने खेड्यापाड्यातील नागरिकांना प्रवासाचे कोणतेही साधन नाही.त्यामुळे तळा बाजारपेठेत शुकशुकाटपसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी तळा बाजारपेठेत संचारबंदीमुळे शुकशुकाट.
Admin Team
0
Post a Comment