अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी असाही अनोखा प्रयोग ; चिपळूण बाजारपेठेत विनाकारांण फिरणाऱ्यांची कोविड टेस्ट
चिपळूण (ओंकार रेळेकर) : शहर आणि ग्रामीण भागात १५ एप्रिल पासून कडक लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर बाजारात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याची नामी शक्कल येथील संपूर्ण प्रशासनाने वापरल्याने विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.अशाप्रकारे कारवाई केलेल्या अनेकांची कोरोना टेस्ट करण्यासाठी शहरातील पवन तलाव मैदानावर रवानगी करण्यात येत होती.यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच वचक बसला आहे.या मोहिमेचे अनेकांनी स्वागत केले आहे.
राज्याप्रमाणेच चिपळूण मध्ये देखील कोरोना पेशंट मोठ्या स्वरूपात आढळत असल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन ची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देताना विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याचे देखील स्पष्ट संकेत दिले होते.त्याप्रमाणे चिपळूनमध्ये,चिंचनाका,पागनाका,जुना बस स्टँड,बहादूरशेख नाका ,गोवळकोट,खेर्डी आदी ठिकाणी पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन बारी,पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ,प्रांताधिकारी प्रवीण पवार,तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ वैभव विधाते यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने नाकेबंदी केली आहे.आताच जनतेने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे अन्यथा पुढील परिस्थिती अवघड असेल असा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे.
Post a Comment