म्हसळा - हरिश्चंद्र सखाराम मोहिते वय ७० यांचे राहत्या घरी १२ एप्रिल २०२१ रोजी रात्री १०.३० वाजता दिर्घ आजाराने निधन झाले.
मुंबई ठिकाणी नोकरी निमित्त गेले असता एका कंपनीत इंडिया बुक हाऊस मध्ये सेल्फ सुपरवाझर मध्ये २१ वर्षे प्रामाणिक पणे काम केले नोकरी सांभाळून सामाजिक कार्याची आवड म्हणून समाजाकडे लक्ष द्यावे ते समाजकार्यात मनापासून सक्रिय झाले.
त्यांचे कार्य म्हसळा तालुक्यातील उल्लेखनीय होते.म्हसळे तालुका बौध्दजन समिती- मुंबई विभागाचे संस्थापक अध्यक्ष २० जानेवारी १९८५ ते १६ मार्च १९९६ पर्यंत एकुण ११ वर्षे कार्यरत होते.
हरिश्चंद्र मोहिते यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा तालुका बौध्दजन पंचायत समिती १४ नोव्हेंबर १९८६ ला संस्था रजिस्टर झाली. आणि आजतागायत हि संस्था म्हसळा तालुक्यात कार्यरत आहे. हरिश्चंद्र सखाराम मोहिते सदर हे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह माजी अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळावर कार्यरत होते.
यांचे म्हसळा तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय , सांस्कृतिक, कौढुंबिक वाखाणण्याजोगी कार्य भापट पंचक्रोशीत, म्हसळा तालुक्यात जिल्ह्यात होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच तालुक्यातील समाजबांधवांनी अंत्यदर्शन घेतले. संघर्ष बौध्दजन युवा मंडळ, मुंबई व स्थानिक - भापट ह्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Post a Comment