म्हसळा - अशोक काते
म्हसळा तालुक्यात कालच कोरोना बाधीत रुग्ण संख्येने 400 चा टप्प्या गाठला असताना आज त्यात अधिक तीन बाधीत रुग्णांची भर पडली आहे तर एक कोरोना बाधीत रुग्ण दगावल्याची घटना घडली आहे.उपचार घेऊन तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.म्हसळा तालुक्यात सातत्याने तीन दिवस तीन रुग्णांची बधितांमध्ये भर पडली आहे.दिनांक 23 एप्रिल रोजी म्हसळा शहरातील 204 नीता अपार्टमेंट धावीर मंदिर परिसरात 32 वर्षीय पुरुष,5 वर्षाची मुलगी आणि कोकबल येथील 83 वर्षाचे वृद्ध पुरुष कोरोना बाधीत सापडले आहेत.उपचार करून वारल येथील 58 वर्षाची महिला, म्हसळा येथील 24 वर्षीय महिला आणि ठाकरोली येथील 29 वर्षीय पुरुष बरे झाले असल्याचे म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांनी माहिती देताना सांगितले आहे.तालुक्यातील उपचार घेत असलेली एकुण रुग्ण संख्या 35 इतकी आहे.तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 403 इतकी नोंद असल्याची माहिती म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांनी दिली आहे.म्हसळा तालुक्यात आज एक कोरोना बाधीत रुग्ण दगावला असल्याने मृत्य संख्या 15 झाली आहे.बधितांपैकी 355 रुग्ण बरे झाले आहेत.उपचार घेत असलेल्यांमध्ये 25 बाधीत रुग्ण होमआयसोलेशन आसुन श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात 6,उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे 1 आणि अलिबाग जिल्हा रुग्णालयात 1 रुग्ण उपचार घेत असल्याचे माहिती अंती समजते.
Post a Comment