तालुक्यात लसीकरणात राखीव कोट्या वरून होणार वाद
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यांत ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे सोमवार दि.१९ एप्रिल रोजी आलेल्या लस साठयांतून १० डोस तेथील कर्मचाऱ्यानी राखीव ठेवल्यावरून वाद झाला तक्रार केल्यावर सर्व डोस उपस्थित ताभार्थ्याना देण्यात आले,तर आज शुक्रवार दि२३रोजी प्रा.आ.केंद्र,मेंदडी येथे लोक प्रतिनिधींच्या राखीव कोटयांतून मला व माझे कुटुंबीयाना लस देण्यात यावी अशी उपस्थितांसमोर प्रतिष्ठा करत मागणी करणाऱ्या लोकप्रतिनिधीला लस न घेताच रिकाम्या हाताने जावे लागल्याची घटना मेंदडी प्रा.आ.केंद्रामध्ये घडली. भविष्यांत म्हसळ व मेंदडी येथील लस कोटयांत राखीव लस हा कळीचा व वादाचा मुद्दा ठरणार आहे.
तालुक्यात कोरोना लसीकरण प्रा.आ.केंद्र मेंदडी येथे प्रथम ८मार्च २०२१ पासून सुरू झाले आजपर्यंत ६४८ एवढ्या लोकांचे (पहिलाआणि दुसरा डोस मिळून) कोण- त्याही तक्रारी न होता लसीकरण झाले आहे, तर दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागील अनेक दिवसापासून पिण्यासाठी व स्वच्छतेसाठी पाणी उपलब्ध नाही, covid अँप मध्ये नोंदणी करण्या साठी कॉंम्पुटरला इंटरनेट जोडणी नाही, लसीकरण लाभार्थी व्हेरिफाय कारण्या साठी कॅमेरा नाही,विदयुत पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी इन्व्हर्टरची व्यवस्था नाही या गैरसोयींबाबत लसीचा राखीव कोटा मागणारे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष कसे करतात हा उपस्थित नागरिकांचा चर्चेचा विषय ठरला होता.
"मेंदडी प्रा.आ.केंद्रातून मिळणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य सेवा प्राधान्याने या पंचक्रोशीतील नागरिकाना मिळाल्या पाहीजे, लसीकरणाचे बाबतीत कोटा नसावा अशी मागणी उपस्थितानी केली, आम्ही मा.पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मु. कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आलिबाग यांच्याकडे हा विषय लावून धरणार"
-श्रीमती शीतकर,वेटकोळी, पायकोळी व अन्य उपस्थित महीला.
"लसीकरणाचे बाबतीत कोटा वगैरे काही प्रकार नाही,नियम,निकषात बसेल त्या प्रथम येणाऱ्या लाभार्थीला प्रथम संधी असे शासनाचे स्पष्ट संकेत आहेत"आमित शेडगे, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन
फोटो : मेंदडी प्रा.आ.केंद्रात सुरु असलेले लसीकरण व प्रा.आरोग्य केंद्राच्या डॉ. श्रीमती नागे, दिवेकर व यशस्वी टीम
Post a Comment