संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोव्हीड लसीकरण केंद्रावर लसीकरण करुन घेण्यासाठी आलेले लोकप्रतिनिधी आणि लसीकरणा साठी रितसर नोंदणी केलेल्या लाभार्थी यांच्या मध्ये शाब्दीक चकमक होऊन रांगेतील नागरिकानी आपले हक्काची मागणी केल्याने लोक प्रतिनिधीना अखेर रांगेतून लस घ्यावी लागल्याची घटना प्रा.आ. केंद्र मेंदडी येथे घडली.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, शुक्रवार दि२३रोजी प्रा.आ.केंद्र,मेंदडी येथे म्हसळा पंचायत समीतीच्या सभापती श्रीमती उज्वला सावंत व त्यांचे कुटुंबीयाना राखीव कोट्यातून लस देण्यात यावी अशी मागणी उपस्थितांसमोर प्रतिष्ठा करत केली होती ,त्यावेळी लससाठा संपल्याने सभापती सावंत व त्यांचे मंडळीना लस न घेताच रिकाम्या हाताने जावे लागल्याची घटना मेंदडी प्रा.आ.केंद्रामध्ये घडली होती. बुधवार दि.२८ एप्रिल रोजी सभापती उज्वला सावंत यानी मेंदडी प्रा.आ.केंद्रामध्ये लसीकरण कक्षांत प्रवेश केला आणि मला व माझे सोबतच्याना लसीकरण करा असे सांगितले यावेळी रांगेतून रितसर नोंदणी केलेल्या लाभार्थीनी त्याना विरोध करीत लसीकरण कक्षांत प्रवेश केल्याने लसी करण कर्मचाऱ्यानी लसीकरण बंद केले,अखेर नियमानुसार लसीकरण सुरु व्हावे अशी लाभार्थ्यानी मागणी केल्याने नियमानुसार लसीकरण सुरु झाले. सभापती श्रीमती सावंत व कणघर -खामगाव येथील अन्य लाभार्थीना लसीकरण करण्यात आल्याचे आरोग्य सूत्रानी सांगितले.
मेंदडी येथील लसीकरण केंद्रातील सभापती उज्वला सावंत यांचा हस्तक्षेप कायदा विरोधी : निलेश मांदाडकर
"कोव्हीड लसीकरण केंद्रावर राजकीय हस्तक्षेप नसावा, कोट्यांतून लसीकरण हा नियम नसल्याने दृष्टीकोन नसावा,लसीक रण केंद्रावरील नियमांचे पालन प्रत्येक लाभार्थीनी करणे आवश्यक आहे. भविष्यांत लसीकरण केंद्रावर प्रशासनाने पोलीस बंदोबस्त द्यावा"
निलेश मांदाडकर, सरपंच , खरसई तथा अध्यक्ष शेकाप पुरोगामी संघटना, म्हसळा -तालुका.
👆 प्रा.आ.केंद्र मेंदडी येथील लसीकरण केंद्रावर सभापती उज्वला सावंत यांच्या हस्तक्षेपामुळे संतप्त लाभार्थी
Post a Comment