पोलीसांचे दुचाकीला टेंपोची घडक : दोनही पोलीस जखमी



संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा श्रीवर्धन रस्त्यावर भरधाव टेंपोने पोलिसांच्या दुचाकीला धडक दिल्याचे घटनेची म्हसळा पोलीसानी गुन्हा.नं. २६/ २०२१ भादवी२७९,३३७,३३८,४२७ मो. वा. का.कलम १८४ प्रमाणे नोंद केली आहे. सदर अपघात बुधवार दि.२८ एप्रिल रोजी दुपारी २.३० .चे दरम्यान घडला MHO6 BW1118 हा टेंपो श्रीवर्धन बाजूकडे जात असता दुचाकी क्रं. MHO6Bk38603 या मोटरसायकलला जोरदार घडक दिल्याने अपघात झाल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले
टेंपो मालक व ड्रायव्हर हरेश्वर पांडुरंग काळे हे अतिवेगाने व दुर्लक्ष करून टेंपो चालवत आसल्याने अपघात होऊन दुचाकी स्वार गणेश शेषराव सानप पो.शि.४७१ आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सखाराम जाधव ब.नं.१११४ ह्याना जोरदार धडक दिली, दुचाकीस्वाराना फॅक्चर स्वरुपाच्या दुखापती झाल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा