म्हसळ्यात आज केवळ दोन जण कोरोना बाधीत ; कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.१० %



संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यांत कोरोना लसीकरणांत बऱ्या पैकी वाढ झाली असताना. तालुक्यात आज केवळ दोन जण कोरोना +(बाधीत) असल्याचे तहसीलदार शरद गोसावी यानी प्रसीद्धी पत्रकांत सांगीतले. तालुक्यात एकूण बाधीत४१२ आहेत,३३ बाधीत रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यातील २१ रुग्णानी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला,९ उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन, २ प्रायव्हेट रुग्णालय व १ जिल्हा रुग्णालय आलिबाग येथे उपचार घेत असल्याचे प्रसिद्धी पत्रकांत म्हटले आहे. आज पर्यंत तब्बल३६३ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत मृतांची एकूण संख्या १६ आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा