तळा किशोर पितळे
संपूर्ण देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकार संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाय योजना करीत असुन देशातील १३० कोटी लोकसंख्या असलेल्या नागरिकांनाकोव्हँक्सिन,रेमडीसिवर रोगप्रतिकारक लस शासकीय खाजगी दवाखान्यात दिली जात असूनलस घेण्यासाठी अनेक जेष्ठ नागरिक,४५ ते५९ वयो गटातील नागरिक मोठ्या संख्येने तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातील सोमवार,बुधवार, शुक्रवार या वारी प्रचंड गर्दी होत असल्याचे लक्षात येऊन विराज केबल नेट वर्कचे मालक विराट टीळक यांनी व्हि सी एन् नेटवर्क ग्रुप आवाहन करून सर्व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती,राजकीय कार्यकर्ते यांनी सामाजिक बांधिलकी जपत येणाऱ्यानागरिकांना बसण्यासाठी खुर्च्याची मदत केली.
तर या काळात कोरोना बाधित रूग्णाला आँक्सिजनची कमतरता पडु नये.म्हणून हिरवळ प्रतिष्ठान महाड, आपलं कोकण मराठी न्युज चँनल, विराज केबल नेटवर्क व रायगड टाईम्स यांच्या सौजन्यानेआँक्सिजन सिलेंडरसह किटची व्यवस्था देखील केली आहे तर काही जणांनी पाण्याची गरजओळखून पाणी बाँटलची व्यवस्था केली तर नागरिकांना बसायला जागा अपूर्ण आहे ओळखून मंडप बांधण्यासाठी रोख रक्कम डॉ. अमोल बिरवाटकर यांच्या कडे सुपूर्त केली. समाजाचे काहीतरी देणे लागतो.या उदात्त हेतूने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपून अशा राष्ट्रीय सामाजिक उपक्रमासाठी उत्फुर्त सहभाग घेऊन गाव करील ते राव काय करील असा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे यामधून समाजकारण काय आणी कसे करावे असा संदेश पोहोचला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.या सामाजिक कार्याचे सर्व स्थरावर कौतुक केले जात आहे.
Post a Comment