तळा(किशोर पितळे)मागील वर्षा पासून संपूर्ण देशात कोरोना महामारीचा राक्षस संपूर्णजगात अहाःकार माजवतअसूनसर्वत्र उद्योगधंदे,नोकऱ्या,व्यवसाय,छोटे मोठे व्यवसाय,कंपन्या,वाहतूक साधने आणी सर्व काही बंद पडुन उपासमारीची वेळआली आहे तर काहीची नोकरीवर गदा येऊन कुटुंबच्याकुटुंबशहरातून गावाकडे आली.या कोरोना काळात लाँकडाऊन, संचारबंदी अशांना तोंड द्यावे लागत असताना तळा तालुक्यातील शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन अहोरात्र मेहनत घेऊन शासनाच्या आदेशाचे पालन करून व नागरीकहीतेवठ्याच धीराने सामना करून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी गाव पातळीवर तालुका पातळीवर व शहरात मोठ्या प्रमाणावर प्रशासनाला सहकार्य केले.त्यामुळेजिल्ह्यात नव्हे तर राज्यात तळा तालुका फक्त १८३वरविसावला होता.व ११ जणांचा मृत्यू झाला.हि आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.शासनाने अनलाँकची घोषणा केली आणी जनजीवन पूर्वपदावर येतअसतानाच मार्च मध्ये पुन्हा कोरोना सिझन२ सूरू करून आपले खरं रूप दाखवायला सूरूवात केली. शासनाने कडक निर्बंधघालून संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न केलाआहे. सभा,देवळ बंद, शाळा,काँलेजेस बंद लग्नाला पन्नास माणसांची परवानगी, मयताला वीस माणसे, अत्यावश्यक सेवावगळता सर्व बंद,सोशल डिस्टंसिग,मास्क बांधणे सँनिटायझरचा वापर अनावश्यक शहरात पेठेत फिरण्याची बंदी अशा एक ना अनेक प्रकारचे कडक निर्बंध घातलेले असताना नागरिक मात्र काही ठिकाणी फज्जाउडवत असल्याने पोलीस प्रशासन नजर ठेवून असूनही गांभीर्याने घेत नसतील तर मात्र कोरोना हि संधी सोडणारच नाही.भल्याभल्यांना पाणी पाजण्याला वेळ दिला नाही.या भयानक रोगाची जन जागृती टी व्ही सिरीयल, व्हिडीओच्या माध्यमातून,सोशल मिडिया प्रिंट मिडियाच्या माध्यमातून करण्यात येत होती. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यात १८३ वर विसावलेला कोरोनाचाआकडा सद्यस्थितीत २२०वर पोहोचला आहेयाकाळात १२व्यक्ती मृत पावले असुन १९ रूग्ण उपचार घेत असून १८९ कोरोनावर मात करून मुक्त झाले आहेत.जरी हि कासवगती वाटत असली तरी कधी उसळी मारेल सांगता येत नाही.काही ठिकाणी पोलीस प्रशासन वआरोग्य प्रशासना कडून गर्दी टाळण्यासाठी व अनावश्यक फिरणाऱ्यांची टेस्ट करण्याची शक्कल लढवून चाप बसवण्याचा प्रयत्न केला जात असून आपल्यावर अशीवेळ आणू देऊ नये शासन संक्रमण रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असून काही दिवस सहनकरून सहकार्य करावे. कोरोना प्रतिबंधक कोशिंल्ड, रेमडेसिवीर,लसीकरण सूरू केले आहे.तरी घाबरून न जाता घ्यावी ती पूर्ण सुरक्षित आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने सिद्ध केले आहे.तरी तळेकरांनो सावधपणे आपले कुटुंब,आपली जबाबदारी या घोष वाक्याचा वापर करून शासकीय यंत्रणेलासहकार्यकरावे.असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कासवगतीने कोरोना मुसंडी मारतोय : तळेकरांनो सावधान!!!
Admin Team
0
Post a Comment