म्हसळा -वार्ताहर
म्हसळा पंचायत समितीच्या सभापती उज्वला सावंत आणि उपसभापती मधुकर गायकर यांच्या पदाचा पक्षाने नेमुन दिलेला कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला असता दिनांक 22 एप्रिल रोजी उपसभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम व दिनांक 3 मे रोजी सभापती पदाची निवडणूक होणार आहे.आज रोजी उपसभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाले वरून विद्यमान पं.स.सदस्य संदीप चाचले यांची बिनविरोध निवड झाली आहे.म्हसळा पंचायत समिती मध्ये सत्तांतर होऊन चार वर्षा पेक्षा अधिक कार्यकाळ पुर्ण झाला आहे.पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित आसुन चार सदस्य संख्या असलेल्या पंचायत समिती मध्ये दोन महिला सदस्या व दोन पुरुष सदस्य आहेत.सुरुवाती पासुनच अडीच-अडीच वर्षाने सभापती पदासाठी झालेल्या आरक्षण सोडतीत म्हसळा पंचायत समिती करता सर्वसाधारण महिलांना राखीव जागेसाठी आरक्षीत झाल्याने सभापती पद उपभोगण्याची पुर्णवेळ संधी महिला सदस्यांना मिळाली आहे.असे असले तरी लोकप्रतिनिधीत्व करण्याची सर्वांना समान संधी असे पक्षाचे ध्येयधोरणा असल्याने पक्ष नेते खासदार सुनिल तटकरे यांचे आदेशानुसार म्हसळा पंचायत समितीच्या सर्वच सदस्यांना आलटून पालटुन सभापती व उपसभापती पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली.त्यानुसार दुसऱ्या टर्ममध्ये सभापती उज्वला सावंत आणि उपसभापती मधुकर गायकर यांचा पदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला असता नव्याने दिनांक 22 एप्रिल 2021 रोजी उपसभापती पदाची निवडणूक कार्यक्रम घोषित झाले नुसार उपसभापती पदासाठी संदीप चाचले यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक कार्यक्रम पार पाडण्यासाठी नि.निर्णय अधिकारी तथा नायब तहसिलदार के.टी.भिंगारे यांनी कामकाज सुरळीत पार पाडले.म्हसळा पंचायत समितीच्या बॅ.ए.आर.अंतुले प्रशासकीय भवन सभागृहात संपन्न निवडणूक कार्यक्रमात गट विकास अधिकारी वाय.एम.प्रभे,सहाय्यक गट विकास अधिकारी कदम यांनी कामकाज यशस्वीपणे होण्यासाठी सहकार्य केले.संदीप चाचले यांच्या उपसभापती निवडी वेळी सभापती उज्वला सावंत, माजी सभापती,विद्यमान सदस्या छाया म्हात्रे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,संतोष उर्फ नाना सावंत,रमेश काणसे,अनिल बसवत,किरण पालांडे,लहूशेट म्हात्रे,गजानन पाखड,पोटले,कदम आदी मोजकेच पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.म्हसळा पंचायत समितीच्या उपसभापती संदीप चाचले यांची निवड झाल्याने व दुसऱ्यांदा उपसभापती होण्याची संधी दिल्याने त्यांनी लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,पक्षाचे नेते व पदाधिकारी यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले आहेत.संदीप चाचले यांची उपसभापती पदी निवड जाहीर होताच त्यांचे राजकीय व सामाजिक स्तरावर अभिनंदन होत आहे.दिनांक 3 मे रोजी सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केले नुसार सभापती उज्वला सावंत यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पं.स.सदस्या छाया म्हात्रे यांची सभापती पदावर वर्णी लागणार आहे.
Post a Comment