म्हसळयात कोरोना बधितांचा 400 चा टप्पा पार 351 रुग्ण झाले बरे,आज सापडले तीन रुग्ण कोरोना बाधीत.
बाबू शिर्के : म्हसळा
म्हसळा तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण संख्येने 400 चा टप्प्या गाठला आसुन बधितांपैकी 351 रुग्ण बरे झाले तर 35 रुग्ण उपचार घेत आहेत.म्हसळयात कोरोनाचे दुसऱ्या लाटेत रोज कमी अधिक रुग्ण सापडत आहेत.म्हसळा तालुक्यात काळ तीन रुग्ण तर आजही तीन रुग्ण कोरोना बाधीत सापडले आहेत तर उपचार घेऊन एक रुग्ण बरा झाला आहे.दिनांक 22 एप्रिल रोजी नवानगर मोहल्ला येथे 56 वर्षीय महिला,म्हसळा दास कंपनी मधील 34 वर्षीय पुरुष आणि खामगाव येथील 75 वर्षाची वृद्ध महिला कोरोना बाधीत असल्याचे तर म्हसळा गवळवाडी येथील 26 वर्षीय महिला उपचार करून बरी झाली असल्याचे म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.तालुक्यातील उपचार घेत असलेली एकुण रुग्ण संख्या आता 35 इतकी आहे.तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 400 इतकी नोंद असल्याची माहिती म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांनी दिली आहे.म्हसळा तालुक्यातील बाधीत 14 रुग्ण दगावले आसुन 351 रुग्ण बरे झाले आहेत.
Post a Comment