आम्ही गिरगावकर" टीमचे पुन्हा एकदा कौतुकास्पद कार्य, "आर्सेनिक अल्बम" होमिओपॅथिक गोळ्यांचे महाराष्ट्र पोलीसांना विनामूल्य वितरण , रायगड पासून सुरूवात
म्हसळा : सुशील यादव
कोरोनाच्या पाहिल्या लाटेमध्ये सरकारी सेवेतील सर्व कर्मचारी आणि अधिकारी पदावर कार्यरत असलेल्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरलेल्या आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचे महाराष्ट्रभर विनामूल्य वितरण करण्याचे कार्य "आम्ही गिरगावकर" टिम ने हर्षल प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. हर्षल प्रधान हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेेत. सध्याची कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रासह देशात थैमान घालीत आहे, या प्रसंगी सर्व पोलीस बांधव स्वतःच्या जीवाची बाजी लावून कोविड योध्याच्या रुपात समस्त जनतेला शासकीय नियमांचे पालन करण्याचे रस्त्यावर उभे राहून आवाहन करीत आहे. या काळात पोलीस बांधवांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी ह्यासाठी "आर्सेनिक अल्बम" ह्या औषधी गोळ्यांचे वाटप करण्याची जबाबदारी "आम्ही गिरगावकर" टीमला पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.
या अनुषंगाने रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या कडे सदर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त गोळ्या देवून पुन्हा महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करण्यात आली, अशी माहिती सचिव मिलिंद गजानन वेदपाठक आणि कोषाध्यक्ष विघ्नेश सुंदर यांनी दिली आहे.
Post a Comment