कणेरी मठ येथे १०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरु



गोकुळ शिरगाव : प्रतिनिधी 

सिद्धगिरी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर कणेरी मठ कोल्हापूर 21 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सिद्धगिरी हॉस्पिटलच्या कोविड केअरची सुरुवात कृषी निवासस्थानच्या इमारतीमध्ये चालू केले आहे .

काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली “रुग्ण सेवा हीच ईश सेवा” ह्या ब्रीद वाक्याने सर्वसामान्य गरजू लोकांना अगदी माफक दरामध्ये कोरोना रोगावरील उपचार मिळावेत व गरजू लोकांची सेवा घडावी ह्या उद्देशाने कोविड युनिट २ ची सुरुवात करण्यात आली आहे . ह्या कोरोना युनिटमध्ये १०० बेडसह ३० ऑक्सिजनयुक्त बेड व १० बेड व्हेंटिलेटरची सुविधा असणारे सुसज्ज असे कोविड केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे . त्याचबरोबर कोरोना आजारावरील उत्तम दर्जाची उपचारपद्धतीसुद्धा अगदी माफक दरामध्ये करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे . आणि सर्वात महत्वाची बाब अशी कि नियमित कार्यरत असे सिद्धगिरी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर ही मुख्य इमारत इतर रोगांवरील रुग्णांसाठी कार्यरत असणार आहे . ह्या कोविड केअर सेन्टरच्या उद्घाटनप्रसंगी मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामीजी , सिद्दगिरी हॉस्पिटलचे डॉ.शिवशंकर मरजक्के , डॉ.रेशम रजपूत , डॉ.प्रकाश भरमगौडर , डॉ.सौरभ भिरूड , डॉ.तनिष पाटील , डॉ.नीता मोरे : डॉ.सचिन पाटील , डॉ.जितेंद्र रजपूत , एम् डी पाटील , गुरुकुलचे प्रल्हाद जाधव तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी , जनसंपर्क अधिकारी प्रविण सुतार व सिद्धगिरी परिवारातील सर्व सदस्य व भक्तगण उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा