मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू वाढताना दिसतोय त्यादृष्टीनं शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेल्या आहेत.दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी असे आदेश शासनाने काढल्याने त्याची अंमलबजावणी करत असताना पोलीस कर्मचाऱ्यांवर सगळ्यात जास्त ताण येत आहे. आपले कर्तव्य बजावताना पोलिसांना वारंवार नागरिकांच्या संपर्कात राहावं लागत असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये या जाणीवेतुन वडवली येथील कोपरा गृपच्या वतीने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसाठी मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप पोमण यांनी कोपरा गृपने पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षा दृष्टीने दाखवलेली सामाजिक बांधिलकी याबद्दल त्यांचे आभार मानले व त्याचबरोबर नागरिकांनी या संसर्गापासुन बचाव करण्यासाठी आपली जबाबदारी ओळखुन स्वतःसुध्दा विशेष काळजी घ्यावी विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे,नियमीत मास्कचा वापर करावा या आजाराशी दोन हात करण्यासाठी नागरिकांनी गरजेनुसार पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.यावेळी कोपरा गृपचे सुशांत पाटील,दिनेश शिरवटकर,नाना सुर्वे,जय मांजरेकर, संग्राम खेउर,अंकित पेडणेकर,विपुल पुसाळकर,कौशल पेडणेकर,नाना पेडणेकर उपस्थितीत होते.
Post a Comment