राम भोस्तेकर माणगाव
माणगांव तालुक्यातील लोणेरे गोरेगाव निजामपूर विभाग ते दाखणे ग्रामपंचायत पर्यंतचा परिसर मागील विधानसभा मतदारसंघ पुनरचनेत महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघ अस्तित्वात आला या माणगाव तालुक्यातील घटक भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेहमीच वर्चस्व राहीले आहे,मागील महिन्यात रायगड लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे यांच्या आदेशाने निजामपूर विभागात पक्ष वाढीसाठी चांगले काम करणारे नेतृत्व चंद्रशेखर(बाबूशेठ)खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली मागील दोन महिन्यात विभागातील रखडलेली विकासकामे, स्थानिक बेरोजगार तरुणांच्या समस्या खानविलकर यांनी निकालात काढल्या
अश्याच प्रकारे माणगांव तालुक्यातील राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गंगावली ग्रामपंचायत हद्दीतील ताम्हाणे गावामधील विधानपरिषद आमदार श्री अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्फ़त आमदार निधीतुन मौजे ताम्हाणे येथील जागृत देवस्थान सोनभैरव मंदिराच्या जीर्णोद्धारा करिता 10 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता त्या मंदिराचा जीर्णोद्धार उदघाटन सोहळा तसेच जिल्हा परिषद सेस फंडातुंन झालेल्या मौजे धाडवे वाडी रस्त्याचे उदघाटन बाबुशेठ खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गंगावली ग्रामपंचायत सरपंच नेहा दाखिनकर,उपसरपंच कल्पेश धाडवे,माजी सरपंच शेखर तोंडलेकर, राष्ट्रवादी निजामपूर विभाग अध्यक्ष संदीप जाधव, सचिव किरण पागार,व गंगावली ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोरोना विषयक शासनाच्या अटी व नियमांचे पालन करून उपस्थित होते.
Post a Comment