निकेश कोकचा : म्हसळा
म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील एक्सरे मशीन तंत्रज्ञाअभावी धूळ खात पडली असून याचा आर्थिक फटका सर्वसामान्यांना नागरिकांना पडत आहे . म्हसळा ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन येऊन अनेक दिवस झाले आहे . मात्र रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने एक्सरे मशिन बंद ठेवण्यात आलेली आहे . यामुळे गरीब रुग्णाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे . त्यांना सातशे ते हजार रुपये मोजून एक्स काढून घ्यावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड पडत आहे . ग्रामीण रुग्णालयात असलेल्या एक्सरे मशिनमुळे तालुक्यातील गरजू रुग्णांना सरकारी किंमतीच्या खर्चात एक्सरे काढून मिळण्याची सोय होऊ शकते .
मात्र ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन तंत्रज्ञ नसल्याने एक्स रे काढले जात नाहीत . रुग्णांना एक्सरे काढण्यासाठी दुसऱ्या तालुक्यात जावे लागते . त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा दोन्हीचे नुकसान होत आहे . रुग्णांना वेळेसोबत मोठ्या प्रमाणात पैसे देखील खर्च करावे लागत आहेत . दुसऱ्या तालुक्यात एक्सरे काढण्यासाठी किमान ७०० ते एक हजार रुपये खर्च करावे लागत आहेत . सामान्य रुग्णांचा आर्थिक छळ थांबवण्यासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील एक्सरे मशीन सुरु होणे गरजेचे आहे .
पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करावाम्हसळा ग्रामीण रुग्णालयातील एक्सरे मशिन लवकर सुरु करून गरीब व गरजू रुग्णांचे होणारे थांबवण्यासाठी पालकमंत्री ना तटकरे यांनी हस्तक्षेप करावा , अशी मागणी तालुक्यातील रुग्णांकडून होत आहे .
Post a Comment