राम भोस्तेकर माणगाव
महाराष्ट्र राज्यात वाढत जाणारा कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या यावर आळा घालण्यासाठी,व संसर्ग साखळी तुटण्यासाठी राज्यशानसकडून सुरुवातीला नवीन (SOP) standerd operating policy लागू करण्यात आली, काही दुकाने बंद व काही दुकाने चालू असे नवीन अटी व नियम लागू करण्यात आले मात्र मागील वर्षी केंद्रासरकार ज्याप्रमाणे लॉक डाऊन जाहीर केला होता त्याप्रमाणे अचानक सर्व यंत्रणा ठप्प झाल्या नव्हत्या तरी देखील माणगाव मधील काही जीवनावश्यक वस्तूचे घाऊक व्यापारी व तंबाखू जन्य पदार्थ विक्रेते यांनी कच्ची बिले करून किरकोळ विक्रेत्यांकडून वर वाढीव दर घेण्यास सुरुवात केली यामुळे त्रस्त किरकोळ व्यापारी व ग्राहक यांनी माणगाव मधील, सुजाण युवा पत्रकारांच्या नजरेत या गोष्टी आणून दिल्या.
याची योग्य दखल घेत माणगाव बाजारपेठेत चाललेल्या सदर प्रकाराबाबत शासन व प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे याकरिता तश्या प्रकारे मालाची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने वस्तू विकणारे यांच्यावर कारवाई ची मागणी करणारे पत्र ई मेल द्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,जिल्हा पुरवठा अधिकारी,जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलीस अधिक्षक ,माणगाव तहसीलदार,प्रांताधिकारी, नगर पंचायत यांना देण्यात आले होते, व तश्याच प्रकारचे लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था (महाराष्ट्र)यांच्या माणगांव तालुक्याकडून देण्यात आले होते यावर दखल घेत,माणगाव नगर पंचायतच्या प्रशासक प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर मुख्याधिकारी राहुल इंगळे कारवाई करण्यात येणार असल्याची दवंडी माणगांव बाजारपेठ व नगरपंचायत चे सर्व प्रभाग येथे करण्याचे आदेश दिले व आज सतत ३ दिवस ही दवंडी माणगाव बाजारपेठेत केली जात आहे व कारवाई करण्याचे आश्वासन देखील पत्रकारांना देण्यात आले आहे.
अश्या कठीण परिस्थितीत वस्तूंचे भाववाढ करून विकणे म्हणजे मयताच्या टाळूवरील लोणी खाणे असा प्रकार आहे,असा प्रकार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर माणगांव नगरपंचायत ने उचललेला कारवाई चा बडगा हा पर्याय उत्तम आहे त्यामुळे माणगांवकर नागरिकांकडून नगरपंचायतीचे कौतुक करण्यात येत आहे
Post a Comment