तळा -किशोर पितळे
संपूर्ण देशात कोरोना महामारीचा उद्रेक होत असून व्हिजन 2 सुरू झाले आहे. अतिशय जलद गतीने प्रसार होत असून राज्यात मागील वर्षा पेक्षा दिवसें दिवस रूग्ण वाढत आहेत. व मृत्यू प्रमाण वाढत असल्याने राज्य शासनाने १५ ता.पासून ब्रेक द चेन संकल्पना राबवीत रात्री ८ वाजले पासून १मे सकाळी ८ वाजेपर्यंत अति कडक निर्बंध घालून कोरोना हरवण्यासाठी युद्ध पातळीवरप्रयत्न केले जात असुन तळा शहरातील सर्व दुकाने, छोटे मोठे व्यवसायीक, शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करीत असून सकाळी ७ ते ११ वा.पर्यंतच बाजारपेठ सुरूआहे. त्यानंतर मात्र निर्मनुष्य झालेली पहायला मिळत आहे. मा.जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी स्थानिक प्रशासनाला दिलेल्या कडकआदेशाचे पालन होताना दिसतआहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहेत. जिल्ह्यात तळा तालुक्यातील रूग्ण संख्या अत्यल्प असून कासव गतीने कोरोना उसळी मारीत असतानाच शासनाने घातलेले निर्बंध निश्चित कोरोना रोखण्यासाठी योग्य ठरणारे आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होऊन बाजारपेठत विनाकारण फिरताना दिसून येत नाहीत. अगदी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक देखील पुढे सरसावले आहेत. "कोरोनाला हरवणारच" अशा तयारीत रायगडकर जनता आहे. या कोरोना महामारीने कोणालाही सोडलेले नाही. आर्थिकनुकसान देशासह सर्वांना सहन करता करता उद्योगधंदे व्यवसाय, नोकरी, आणी आर्थिक घडी विस्कटलीअसून बरेंच काही यामध्ये भरडले गेले.काहीच्या नोकऱ्या गेल्या मोठ्या प्रमाणावर जीवीत हानी झाली आहे.हाँस्पिटल फुल बेड मिळत नाही. आँक्सिजन सिलेंडरचा तुटवडा, रेडमेसिवर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. त्यात कोरोनाचा पसार जलद गतीने होत आहे.यासगळ्याला जनता कंटाळली असल्याने शासनाला सहकार्य करीत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अत्यावश्यकआस्थापना शासकीय आदेशाचे पालन करीत नसल्यास फौजदारी गुन्हा व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस यंत्रणेकडून अलाऊन्समेंट करण्यात येत आहे. बाजारात विनाकारण फिरू नये तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येतआहे.कोरोना संक्रमण रोखणे हा एकमेव उपाय असल्याने कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होईल असे वाटत आहे.
Post a Comment