श्रीवर्धन प्रतिनिधी:- तेजस ठाकूर
श्रीवर्धन शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव व सध्याच्या संचारबंदी चे पालन करता. श्रीवर्धनमध्ये शिवरुद्र कराटे अकॅडमी तर्फे ऑनलाइन प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. श्रीवर्धन मधील नगरपरिषद शाळा क्रमांक १ मध्ये शिवरुद्र कराटे अकॅडमी च्या वतीने कराटे मल्लखांब लाठी-काठी चे क्लासेस घेतले जातात. मात्र संचारबंदीच्या कालावधीमध्ये सदरचे क्लास बंद करण्यात आले आहेत.
शिवरुद्र कराटे अकॅडमी चे प्रशिक्षक श्री शैलेंद्र ठाकूर हे श्रीवर्धन शहर, जसवली व बोर्लिपंचतन या गावातल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करतात. सदरच्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. त्या कारणास्तव संचार बंदी च्या काळात सुद्धा विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी शारीरिक व्यायाम, कराटे आणि लाठी-काठी चा सराव करत असल्यामुळे पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांचे व शिवरुद्र कराटे अकॅडमी चे कौतुक केले जात आहे.
माझा मुलगा आता १२ वर्षाचा आहे. त्यानी कराटे क्लास सुरू केल्यापासून मोबाईल मध्ये गेम खेळण्याचा प्रमाण फार कमी झाले आहे. त्याला कराटे व लाठीकाठी ची आवड निर्माण झाल्याने नियमितपणे तो घरी सराव करत असतो.
-समीर बोरकर (पालक)
संचारबंदी असल्याकारणाने कराटे क्लासला सुट्टी देण्यात आली आहे. तरी आपण ऑनलाईन पद्धतीने कराटे क्लास घेत आहोत. दररोज सराव केल्याने शरीराची चपळता वाढते व मन संतुलित राहते.
- शैलेंद्र ठाकूर (प्रशिक्षक)
Post a Comment