मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेल्या निर्बधामुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून नागरीकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध आले आहेत.हजारो कुटुंबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाल्याने गोरगरीबांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.या परीस्थितीचा मानवतेच्या दृष्टीकोनातुन विचार करुन श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी शनिवार दि.२४ एप्रिल रोजी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांजळे व कोंडेपंचतन या दुर्गम गावातील गरीब गरजु अशा पंचवीस कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप कोरोना नियमांचे पालन करुन केले.यावेळी त्यांनी सांगितले कि "कोरोना माहामारी विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी आरोग्य,महसुल, ग्रामविकास,पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी संयमाने लढा देत आहेत.कोरोना निर्बंधांमुळे अडचणीत असलेल्या व हातावर पोट असलेल्या कुटुंबांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे अशा संकटात समाजाप्रती आपण आपले कर्तव्य केले पाहिजे.आम्ही मदत नव्हे तर कर्तव्य भावनेतून या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
भविष्यात जसे शक्य होईल तशी मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल" या सेवाभावी उपक्रमासाठी दिघी सागरी पोलीस कर्मचाऱ्यांनी विषेश मेहनत घेतली.
Post a Comment