श्रीवर्धनमधील धक्कादायक घटना ; डॉक्टरने महिला रुग्णावर दवाखान्यात केला बलात्कार


श्रीवर्धनमधील धक्कादायक घटना गुन्हा दाखल; डॉक्टर अटकेत
 
श्रीवर्धन : दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णावर डॉक्टरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना श्रीवर्धनमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. डॉक्टरी पेशाला काळीमा फासणार्‍या या घटनेनंतर श्रीवर्धन शहरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 
19 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास जसवली येथील एक विवाहित महिला छातीत दुखत असल्याने  श्रीवर्धन बाजारपेठ येथील  डॉ.प्रविण बंदरकर याच्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी गेली होती. यावेळी डॉक्टर तपासत असताना या महिलेला डॉक्टर काही विचित्र प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले.
म्हणून तिने डॉक्टरला ‘आपण हे काय करताय?’ अशी विचारणा केली असता, ‘मी आपणाला तपासत आहे’ असे उत्तर डॉक्टरने दिले.  मात्र या डॉक्टरने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार त्यानंतर घडला. याप्रकरणी पीडित महिलेने श्रीवर्धन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
 
पीडित महिला विवाहित असून, तिला दोन वर्षांचे एक लहान मूल आहे. याप्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक गावडे या करत आहेत.

 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा