स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल कोण घेणार निर्णय? नागरिकांचा सवाल?
संजय खांबेटे : म्हसळा
राज्यात बुधवारी रात्रीपासून १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर झाले .म्हसळा बाजार पेठेत अत्यावश्यक वस्तूंची दुकाने ७ ते ११ उघडी राहीली आणि प्रशासन व पोलीसांच्या बड्यानने दुकाने बंद झाली, शहरांतील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने,डेअरी,बेकरी,कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने, (चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह), कृषी उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरु राहणार मात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत होम डिलि व्हरी करता येणार असल्याचे सांगण्यात आले.
म्हसळा बाजारात किराणा खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली परंतु ११ च्या ठोक्याला प्रशासन व पोलीसांच्या बडग्याने दुकाने व बाजारपेठ बंद झाली यामध्ये तहसीलदार,Ceo नगरपंचायत,पोलीस निरिक्षक,उपनिरीक्षक व अन्य पोलीस कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी यांचा समावेश होता.
स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल असा स्पष्ट आदेश असताना म्हसळा शहरांतील लॉक डाऊनची वेळ सकाळी ९ ते १ नंतर करावी अशी व्यापारी व ग्राहकांची मागणी प्रशासनाने का फेटाळली अशी चर्चा नागरिक व व्यापारी करत आहे.
"म्हसळा शहरांत आत्यावश्यक सेवेमधील किराणा व्यापारातील दुकानातील नोकर व अन्य कर्मचारी आणि ग्राहक ग्रामिण भागां तून येत असतात त्यामुळे सर्वसाधारणपणे बाजारपेठ सकाळी ९ वा. उघडते, स्थानिक प्रशासनाने सारासार विचार करता अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ९ ते दु. १ उघडी ठेवावीत"
युनूस मेमन , किराणा मालाचे अग्रेसर व्यापारी.
"म्हसळा शहरांतील किराणा,भाजी, दुकाने फळ दुकाने,डेअरी,बेकरी,कनफेकशनरी व अन्य दुकानांच्या संखेचा विचार करता त्यामधील ७० ते ८० टक्के व्यवसायिक हे मुस्लीम आहेत, रमजानच्या पवित्र महिन्यांत प्रत्येक मुस्लीमांमध्ये पहाटे ३.३० ते ६ या वेळेत सहेरी,फझरची नमाज या साठी वेळ दिला जातो, त्यामुळे बहुतांश दुकाने ९ ते १ या वेळेत उघडी रहावी अशी मागणी शासनाकडे आम्ही करणार आहोत"रफीकभाई चणेकर, सामाजिक नेते, म्हसळा.
"म्हसळा तालुक्यात आज मितीस कोरोना बाधितांची संख्या३९४, उपचार घेत असलेली रुग्ण संख्या ३३, बरे झालेले रुग्ण ३४७ आहेत. स्थानिक प्रशासनाने स्थानिक कोव्हीड लागण वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला मा.मुख्यमंत्र्यानी दिलेले आहेत त्या बाबत प्रशासनाने योग्य तो विचार करावा. आम्ही म्हसळा बाजारपेठ स.९ ते दु.१ या वेळेत उघडी रहावी यासाठी पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांच्याकडे मागणी करणार आहोत"
महादेव पाटील, तालुका प्रमुख शिवसेना, म्हसळा.
Post a Comment