म्हसळा - अशोक काते
कोरोनाची दुसरी लाट लॉकडाऊन करूनही थांबायचे नाव घेत नाही. प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने म्हसळा तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण कमी अधिक संख्येने सापडत आहेत तर उपचार करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे.दुसऱ्या लाटेत म्हसळा तालुक्यात रुग्ण दगावल्याची एकही घटना घडली नसल्याने तेवढाच दिलासा मिळत आहे.सर्वत्र लॉकडाऊन सदृश परिस्थिती असल्याने कोरोना बाधीत होण्याची साखळी तुटण्यास आता मदत होईल असे वाटत असताना म्हसळा तालुक्यात एकाच दिवशी आठ रुग्ण कोरोना बाधीत झाले आहेत.असे असले तरी कोरोना चाचणी आणि लसीकरण करण्याचे प्रमाणात वाढ होणे गरजेचे आहे.दिनांक 20 एप्रिल रोजी खामगाव येथील 32 वर्षीय पुरुष,31वर्षीय महिला,9 वर्षीय मुलगी,म्हसळा येथे 27 वर्षीय महिला आणि 11 वर्षाचा मुलगा, संदेरी येथील 5 वर्षाचा मुलगा, वरवठणे आगरवाडा येथील 48 वर्षीय पुरुष आणि साळवींडे येथील 26 वर्षाचा तरुण कोरोना बाधीत सापडले असल्याचे म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.तालुक्यातील घुम येथील 42 वर्षीय पुरुष आणि खामगाव येथील 22 वर्षाची तरुणी असे दोन बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तालुक्यातील उपचार घेत असलेली एकुण रुग्ण संख्या आता 33 इतकी आहे.तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 394 इतकी नोंद असल्याची माहिती म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांनी दिली.म्हसळा तालुक्यातील बाधीत 14 रुग्ण दगावले आसुन 347 रुग्ण बरे झाले आहेत.म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना हॉटस्पॉट तयार झाला असल्याची सद्याचे स्थितीत बाधीत रुग्ण आकडेवारी पाहता दिसून येत आहे.
Post a Comment