म्हसळयामध्ये खरेदीसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी ; नागरिकांसहित नगरपंचायतीला कोरोनाचा विसर



म्हसळा(निकेश कोकचा)

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना प्रसार वेगाने होत असल्याचे पाहता पुन्हा एकदा कठोर निर्भंदासहित लॉकडाऊन लावण्यात आला आहे.मात्र या लॉकडाऊन च्या नियमाची नागरिकांकडून पायमल्ली होत असून बाजारात खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.
म्हसळा शहरातील बाजारपेठेमध्ये देखील अशीच स्थिती असून खरेदी साठी नागरिक मोठ्याप्रमाणात गर्दी करीत आहेत.बाजारपेठेत नगरपंचायती मार्फत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने शासनाच्या नियामांसहित सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होत आहे.२२ एप्रिल पर्यंत तालुक्यात कोरोना रुग्णाचा आकडा चारशे पार गेला असून ३५ रुग्णांवर उपचार सुरु आहे तर,  १४ जन मृत्यमुखी पडले आहेत.असे असताना देखील नगरपंचायत मधील अधिकारी उपाययोजना करण्यासाठी आपल्या केबिन मधून बाहेर पडताना दिसत नाहीत.सकळी ७ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत संपूर्ण म्हसळा बाजारपेठ खरेदीसाठी भरलेली असते.या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन अपयशी ठरल्यास म्हसळा शहरासाहित तालुका कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट होण्यापासून कोणतीही यंत्रणा व दवाखाने रोखू शकत नाहीत.


नगरपंचायती कडून जनजागृतीचा अभाव-
म्हसळा शहरातील व्यापारीवर्ग वखरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अद्याप ७ वाजता दुकान उघडायचे आणि ११ वाजता बंद करायचे या व्यतिरिक्त लॉकडाऊन ची नियमावली माहित नाही.म्हसळा नगरपंचायत मधील अधिकाऱ्यांना देखील लॉकडाऊनची नियमावली  व्यापार्यांना समजावून सांगावी एवढा वेळ नाही.नगरपंचायतीकडून जनजागृतीच्या अभावामुळे शहरातील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.

फोटो- म्हसळा बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी जमा झालेली गर्दी दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा