म्हसळा(निकेश कोकचा)
म्हसळा तालुक्यातील भापट सजाचे तलाठी पांडूरंग दगडू पाघिरे वय ४९ वर्षे यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचावर अहमदनगर येथील जामखेड येथे उपचार सुरु होते.
पाघिरे हे मूळ करमाळा जिल्हा सोलापूर येथील आहेत. ३ एप्रिल १९९८ ला त्यांना तलाठी म्हणून नोकरी मिळाल्यापासून ते आतापर्यंत ते म्हसळा तालुक्यातील वरवठणे, कोंझरी, देवघर, पांगलोली, मेंदडी,भापट या गावातील तलाठी सजाचे काम पहायचे.पाघिरे यांना ७ एप्रिल रोजी कोरोना झाला होता.यानंतर त्यांना ३ दिवस उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे भरती करण्यात आले होते.पाघिरे यांना अन्ननलीकेचा देखील आजार होता.यामुळे ते पुढील उपचारासाठी मुळगावी गेले होते आणि तेथेच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.तलाठी पाघिरे यांच्या पाश्च्यात त्यांची पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा कुटुंब आहे.
Post a Comment