श्रीवर्धनमध्ये संचारबंदी चे परिपूर्ण पालन व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद




 श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर

         संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करत श्रीवर्धनमध्ये नागरिकांनी शनिवार व रविवार अशा विकेंड लॉकडाऊनचे  पालन केले. दिनांक २४ व २५ एप्रिल रोजी पोलिसांच्या नाकेबंदीमुळे व नगरपालिकेच्या सूचनेने श्रीवर्धन शहरात संचारबंदीचा असा उस्फूर्त प्रतिसाद दिसण्यात आला. शनिवार व रविवार सकाळी ११ नंतर रुग्णालय आणि औषधांची दुकाने वगळता इतर दुकाने व खाजगी वाहने पूर्णतः बंद होती.
          श्रीवर्धन शहरात सर्वत्र शांतता पसरली होती व बाजारपेठेत शुकशुकाट अनुभवण्यात आला. श्रीवर्धन चे तहसीलदार सचिन गोसावी व पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बाबर यांनी श्रीवर्धनमध्ये विकेंड लॉकडाऊनची पाहणी केली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा