आणि अजगराचे प्राण वाचले....




शब्दांकन  : राकेश झाडे - हिंगणघाट 

निसर्गसाथी गुणवंत ठाकरे  
सकाळी पायदळ फिरून श्री धानोरकर यांची वीट भट्टी असलेल्या शेतात योगा करीत असताना समोर नदीवर मासे पकडण्याचा जाळीत अजगर फसल्याचे त्यांना कळले त्यांनी तिथे जाऊन अजगराला जाळीतून बाहेर काढले व रेतीवर ठेऊन राकेश झाडे यांना कॉल केला परंतु अजगराची काहीच हालचाल होत नव्हती म्हणून दुसरा कॉल करून अजगर मृत झाला असावा अशी माहिती दिली राकेश व मी आम्ही दोघेही तिथे पोहोचलो अजगराची हालचाल नव्हतीच .
 मी त्याला काडीने स्पर्श केला तेव्हा थोडी त्याने हालचाल केली मी त्याला हाताने उचलून त्यावर पाणी सोडले आता त्याची हालचाल वाढली तो जिवंत असल्याची खात्री पटली बराच वेळ जाळीत अडकून पाण्यात असल्याने तो थकून मरणासन्न अवस्थेत गेला होता .
            अजगराला पाण्याने धुऊन स्वच्छ केले शरीरात त्राण नसल्याने त्याने धुताना काहीही हालचाल केली नाही .त्याला चुंगळीत टाकून मी घरी आणले.  आत्ता अजगराची हालचाल बऱ्यापैकी व्हायला लागली होती ,मग मा कुरवाळे साहेब राउंड ऑफिसर वनविभागा यांना कॉल करून अजगर घेऊन जाण्याची विनंती केली निसर्गसाथी कडून कॉल असल्याने त्यांनी लगेच प्रतिसाद दिला व श्री कोळसे व श्री महाकाळकर या दोन कर्मचाऱ्यांना पाठवले अजगराला त्यांचा स्वाधीन केले अजगराची लांबी 8 फूट होती त्याचा नाकाला थोडे रक्त लागले होते .
    अजगर हा  सरपटणारा प्राणी असून आपल्या भागातील तो सर्वात मोठा सर्प आहे याची लांबी 16 फुटा पर्यंत असू शकते आपल्या परिसरात कोपरा या गावी सर्वात मोठा अजगर 13 फुटा चा मी पकडला आहे त्याने एका बकरी ला गिळले होते . 
सामान्यतः 8 ते 9 फुटा पर्यंत ते मिळतात वन्यजीव संरक्षण कायदा प्रमाणे याचा समावेश अनुसूचि 1 मध्ये करण्यात आला आहे याला Indian Rock python म्हणता ग्रामीण भागात याला चित्तींन म्हणून ओळखले जाते .जिथे पाणी असेल म्हणजे नदी, ओढे ,तलाव तिथे उंदीर, घुस,ससे असतात,  तिथे याचा वावर असतो पाण्याजवळ अजगराला त्याची शिकार सहजतेने मिळते  . पंचनामा करून वनविभागाकडून निसर्गात सोडण्यात आले .


     
मासेमारीच्या जाळीत हे अजगर नेहमी फसतात . बरेचदा  रोड चा बाजूला अजगर मारून टाकलेले मला दिसले आहे . अजगर हा निसर्गाचा एक घटक आहे. आशा करूया या नंतर  अजगराची हत्या होणार नाही.
 -प्रविण कडू, निसर्गसाथी फाउंडेशन

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा