आमदार निधीतून कोविड सेंटर साठी निधी देणारे भरतशेठ गोगावले रायगड मधील पहिले आमदार.
राम भोस्तेकर माणगाव
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढणारी रुग्णसंख्या व कमी पडत जाणारी आरोग्यविषयक साधनांची उपलब्धता यावर सकारात्मक पाऊले उचलत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक आमदारांनी आपल्या आमदार निधीतील १ कोटी रु रक्कम आपल्या तालुक्यातील कोविड सेंटर साठी द्यावा असे आदेश दिल्यानंतर महाड पोलादपूर माणगांवकरांसाठी कोविड सेंटर साठी १ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला,कोविड सेंटर साठी आमदार निधीतून सर्वप्रथम रक्कम देणारे आमदार भरतशेठ गोगावले हे रायगड मधील पाहिले आमदार ठरले आहेत.
हा निधी आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या निधीतून देण्यात आला आहे असे आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले आहे व महाड पोलादपूर माणगांव हा विधानसभा मतदारसंघ हे रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असल्याने कोविड रुग्णांचे हाल होऊ नये याकरिता सर्वप्रथम या मतदार संघासाठी हा निधी उपलब्ध केला असल्याचे देखील आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले व या १ कोटी पैकी ७५ लाख हे महाड पोलादपूर साठी व उर्वरित २५ लाख हे माणगाव तालुक्यातील कोविड सेंटरसाठी वापरण्यात येणाऱ असल्याचे देखील आमदार भरतशेठ गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
Post a Comment