भाषेमुळे आपली ओळख बनते - मोहना कारखानीस



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विश्वभान प्रतिष्ठन (रजि.) मुंबई यांच्या वतीने 'दिवसभर मराठी : एक दिवस कुसुमांजलीचा' ह्या ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त फेसबुक लाईव्ह वरून मराठी भाषा प्रेमींशी संवाद साधताना सिंगापूर येथे वास्तव्यास असणाऱ्या लेखिका मोहना कारखानीस म्हणाल्या, "भाषेमुळे आपली ओळख निर्माण होते". सदर कार्यक्रमाचे उदघाटन करताना त्या पुढे म्हणाल्या, "भाषेवरून आपले  व्यतिमत्व ठरते आपले भाषा हेच आपले अस्तित्व असते, आपल्या मातृभाषेत नाव सांगण्याची जी अवीट गोडी आहे ती दुसरी कशात नाही."
याच कार्यक्रमाचे ध्वनिचित्रफीत माध्यमातून उदघाटन करणाऱ्या निवृत्त प्राध्यापिका संध्या शहापुरे यांनी ऑनलाईन असणाऱ्या भाषा प्रेमीं बरोबर ध्वनिचित्रफीतीच्या माध्यमातून संवाद साधला. दिवसभर चाललेल्या उपक्रमात प्रतिक्षा नांदेडकर (सिंगापूर), स्मिता चिद्रवार (कॅलिफोर्निया) या विदेशी वक्त्यांनी आवर्जून हजेरी लावली होती, हे विशेष.
अनंत बापट, डॉ. सूर्यकांत आजगावकर, अश्विनी कुंभार, स्मृती धावडे, सुवर्णा जाधव, साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर,अभिनेत्री, निवेदिका तसेच साहित्यिका पुजा काळे, बाल व्याख्याती स्नेहल तुपे, प्रा. वर्षा पाठक, भाग्यश्री गाभारे, प्रीती पंडित, विजया पाटील, जगनाथ काकडे, वैशाली कलमानी, शिरीष पोफळे, मंजू गटणे, सुभाष नाईक, संजय वेदक, आर जे कैलास नाईक, निलेश चिलमपुरी, वीरेंद्र चित्रे या  वक्त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कुसुमाग्रजच्या जीवनप्रवासावर आणि त्यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. तसेच मराठी भाषेची अविट गोडी सुद्धा आपल्या मनोगतातून ऑनलाईन प्रेक्षकांपर्यंत पोहचवली.
श्रावणी सुर्वे, मधुरा झेमसे आणि प्रिया जोईल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाच्या समन्वयिका म्हणून जबाबदारी पार पाडली. विश्वभान प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा विंदा वीरकर ह्यांनी याच कार्यक्रमा अंतर्गत छोट्या छोट्या अमराठी विध्यार्थ्यांकडून मराठी कविता आणि मराठी भाषेविषयीची त्यांची मते असा एक बहारदार कार्यक्रम केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद्घाटकांची ओळख मधुरा झेमसे ह्यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन प्रिया जोईल ह्यांनी केले.
विश्वभान प्रतिष्ठानच्या सचिव अश्विनी टिळक आणि अध्यक्ष जगदीश संसारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरीने मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा