तळा बसस्थानकात ध्वनिक्षेपणाद्वारे गाडीची सूचना देण्याच्या पाठपुराव्याला यश. मशीन कित्येक वर्षा पासून पडले होते धूळखात.
तळा(किशोर पितळे) तळा बसस्थानकात प्रवाशांना येणाऱ्या जाणाऱ्या एसटीची माहिती ध्वनी क्षेपणाद्वारे दिली जावीअशी मागणी तळा पत्रकार संघ व प्रवाशां कडून करण्यात येत होती.याची दखल वाहतूक नियंत्रक विलास धोत्रे यांनी घेऊन तात्काळ दुरुस्ती करून ध्वनीक्षेपण चालू केले आहे. बसस्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक स्थानकात प्रवाशांना ध्वनीक्षेपणाद्वारे सूचना दिली जाते. मात्र तळा बसस्थानकातील सूचना देण्याचे मशीन गेली कित्येक वर्षांपासून धूळखात पडलेले होते.यामुळे प्रवाशांना स्थानकात कोणती गाडी येणार आहे अथवा स्थानकात उभी असलेली गाडी कोठे जाणार आहे याची काहीच कल्पना नसते. स्थानकात वयोवृद्ध नागरिक देखील गाडीचा बोर्ड वाचता येत नसल्याने तासंनतास बसून असतात. ध्वनीक्षेपण(माईक)द्वारे सूचना देण्यात येत नसल्याने आपली गाडी कधी येईल याची त्यांना काहीच माहिती नसते. काही वेळा पाणी बॉटल,एखादे खाद्य पदार्थ किंंवा एखादीजीवनावश्यक वस्तू आणण्यास गेलेल्या प्रवाश्याची थोडक्यासाठी गाडी सुटण्याच्या कित्येकदा घटना घडल्या आहेत. अशा वेळी दुसरी गाडी दोन ते तीन तासानंतर असल्याने जास्तीचे पैसे खर्च करून खाजगी वाहनाने या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचावे लागते. त्यामुळे तळा बसस्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची ध्वनिक्षेपणा सूचना देण्यात सुरुवात झाली असल्याने जेणेकरून वयोवृद्ध प्रवाशांना तसेच स्थानकाच्या आजूबाजूला खरेदी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना आपल्या गाडीची माहिती मिळूलागली आहे.त्यामुळेखाजगी वाहनाकडे, रिक्षा मिनीडोअर रिक्षांं कडे न जाता बस कडे वळून प्रवाशांना व महामंडळाला फायदा झाला आहे.त्यामुळे प्रवाशी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.मात्र गाड्यांच्या वेळा पत्रक बोर्ड गेले कित्येक महीने नाही. तो देखील बसविण्यात यावा.तसेच बदलणाऱ्या गाड्याचे टाईमिंगची नोंद सुचना बोर्ड वर करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्ग व विद्यार्थी यांनी केली आहे.
Post a Comment