तळा (किशोर पितळे) छत्रपती शिवाजी महाराजयांची तिथीनुसार शिवजयंती उत्सव तळा तालुका व शहर यांच्या वतीने जयंती च्या पुर्व संध्येला कोविंड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदानशिबीर दि.३०रोजी सकाळी९.३०वा ब्राह्मण सभा हाँल मधली आळी येथे घेण्यात येणार आहे या कार्यक्रमाला महाड-पोलादपूर चे आमदार मा.भरतशेठ गोगावले, दक्षिण रायगड संपर्क प्रमुख मा. सदानंद थरवळ,जिल्हा प्रमुख मा.अनिलजी नवगणे याची उपस्थित लाभणार आहे.दि.३१ मार्च२१ रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार असून सकाळी १०वा. शिवप्रतिमेची प्रतिस्थापना११वा. श्रीसत्यनारायणाची महापुजा१२वा.गरीब गरजूंना अन्न धान्य वाटप,सांय ५ शिवमर्दानी आखाडा व मल्लखांब साळाव (रेवदंडा)याचा असून बळीचानाका बाजारपेठ येथे होणार आहे.कोरोना महामारीचे सावट असल्याने शासकीय नियमानुसार काटेकोर पालन करून साजरा केला जाणारआहे. एक रक्तदानदेईल तिघांना जिवदान ।तरी कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा वाढवावी. असे तालुका प्रमुख प्रद्युम्नढसाळ शहर प्रमुख राकेश वडके,शिवसैनिक पदाधिकारी नगरसेवक,महीला संघटक यांनी आवाहन केले आहे.
तळा तालुका शिवसेनेच्या वतीने शिव जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन.
Admin Team
0
Post a Comment