मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ लोणेरे हद्दीतील मोबदला प्राप्त झालेल्या नागरिकांनी आपल्या जागा व बांधकामे मोकळी करण्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे आवाहन


मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ लोणेरे हद्दीतील मोबदला प्राप्त झालेल्या नागरिकांनी आपल्या जागा व बांधकामे मोकळी करण्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे आवाहन


राम भोसतेकर लोणेरे/माणगाव

माणगाव तालुका हा जिल्ह्यातील माध्यवर्ती  तालुका आहेच आणि राष्ट्रीय महामार्ग ६६ हा तालुक्यातील मध्यवर्ती शहरातून जात असल्याने माणगाव तालुक्याला अनन्य-साधारण महत्त्व प्राप्त होणार आहे त्यामुळे नागरिकांनी शासकीय कामास सहकार्य करावे अश्या प्रकारचे आवाहन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या कडून करण्यात आले आहे

 माणगांव तालुक्यामधुन राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम वेगाने  सुरू आहे माणगांव शहराबाहेरून जाणारा हा महामार्ग मात्र लोणेरे शहराच्या मध्यातून जात आहे याचे भु संपादन देखील झाले आहे. तरी ज्या नागरिकांनी मोबदला प्राप्त केला आहे अश्या नागरिकांनी आपल्या जमिनी व बांधकामे मोकळी करावी असे आवाहन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांच्या कडून केली गेले आहे व तश्या प्रकारच्या सूचनांचे फलक लोणेरे शहरात हायवे वर लावण्यात आले आहेत व तश्या प्रकारची दवंडी देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून लोणेरे शहरात दिली जात आहे..


माणगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ करिता लोणेरे हद्दीतील ज्या जागा व बांधकामे यांचा मोबदला ज्या नागरिकांना मिळाला आहे त्यांनी आपली जागा व बांधकामे मोकळी करून देऊन शासकीय कामास सहकार्य करावे.
प्रशाली दिघावकर /जाधव.प्रांताधिकारी माणगाव.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा