पथदिव्याचे वीजबिल शासनान अदा करावे ; सरपंच संघटनेची मागणी



 म्हसळा (वार्ताहर)
म्हसळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे पथदिवे वीजबिल भरणा न केल्याने खंडित करण्यात आले आहे. त्यामुळे म्हसळा नगरपंचायत वगळता तालुक्यातील सर्वच गावांमध्ये अंधार झाला आहे.त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन सहन करावा लागत आहे.तसेच होळीचा सण जवळ आल्याने आणखी अडचणी निर्माण होणार आहेत. यापूर्वी पथदिव्याची बिले शासनाकडून भरली जात होती.ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असल्याने वीजबिलाचा बोजा ग्रामपंचायतीला भरणे शक्य होत नाही.त्यामुळे शासनाने पूर्वीप्रमाणे वीज बिल भरून वीज पुरवठा खंडित केलेले पथदिवे पुन्हा चालू करावे अशी मागणी म्हसळा तालुका ग्रामपंचायत सरपंच संघटनेने तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी खरसई सरपंच निलेश मांदाडकर, सरपंच चंद्रकांत पवार, सरपंच गणेश बोर्ले,रमेश खोत, अनंत कांबळे, अनंत नाक्ती, फारुक हजवाने, महेश घोले, रेश्मा कांनसे आणी तालुक्यातील मोठया प्रमाणात सरपंच उपस्थित होते.

म्हसळा तालुक्यात अजूनही काही गावात पथदिवे चालू आहेत. त्यामुळे महावितरणने कायदा फक्त काही ग्रामपंचायतींना ठेवला आहे का ?                                   किरण पालांडे ( शांतता कमिटी सदस्य रायगड जिल्हा)

              म्हसळा तालुक्यातील 80% ग्रामपंचायतीचे मीटर हे फौल्टी आहेत.त्यामुळे त्यांना वापरानुसार बिल न देता सरासरीने भरमसाठ बिल आली आहेत.याला जबाबदार महावितरण आहे. त्यामुळे ही बिल कशी भरली जाणार.
 - निलेश मांदाडकर, सरपंच खरसई

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा