तळा तालुक्यातील २६ ग्रामपंचायती अंधारात महावितरणची ३कोटी ३६ लाख ९ हजार ३४१ थकबाकी.



तळा(किशोर पितळे)तळा महा विजवितरण चे तालुक्यातील २५ ग्रामपंचायत व नगरपंचायत वीज ग्राहकांनी रू ३ कोटी ३६ लाख ९ हजार ३४१थकबाकी असल्याने तालुक्यातील ग्रामपंचायतीची स्ट्रीट लाईट कट केल्याने अंधारात चाच पडावे लागत आहे. होळीचा सणजवळआल्यानेचाकरमान्यांना मोठ्या समस्या सामोरे जावे लागणार आहे.थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून कारवाई करण्यात आली आहे. सदर ग्रामपंचायतीना दिलेल्या मुदतीत बिलाची रक्कम महावितरणकडे भरणा न केल्याने महावितरणच्या वरीष्ठकार्यालयाच्या आदेशानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात आले असल्याचे तळा वितरणचे उपकार्यकारी अभियंता  के डी महींद्रकर यांनी प्रतिनिधीशी सांगितले.तळा तालुक्यातील काकडशेत, गिरणे, पन्हेळीतळेगाव, मालुक, सोनसडे,
बोरघर, मेढारोवळा, मांदाड, वाशी, पढवण, निगुुडशेेेत, पिटसई, उसर, वांजळोशी चरई, रहाटाड, वरळ, मजगांव बोरीचामाळ,शेणवली, महागांव, भांनग,फळशेत,व तळा नगरपंचायत अशी एकूण ४३४३ ग्राहकांची ३ कोटी३६लाख ९३४१ रु.थकबाकीआहे.ग्रामीणभागातील ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असल्याने वीज बिलाची रक्कम ग्रामपंचायतीला भरणे शक्य नसते. पुर्वी पासून पथदिवे बिल हे राज्य शासन यांच्या कडून भरले जाते.महावितरणला आर्थिक संंकटाचा विचार करून वीज ग्राहकांंनी थकबाकीचा भरणा करावा अन्यथा वीज खंडित केली जाईल.महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कडून करण्यात येत आहे.  


"तालुक्यातील२५ग्रामपंचायतीची पथदिवे थकित वीजबिले भरणे बाकी असल्याचे पत्र महावितरण कडून प्राप्त झाले आहे.थकबाकी भरण्यासाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जात आहे.
-विलास यादव गटविकास अधिकारी तळा.

"तळा नगरपंचायतीची पथदिवे थकित वीजबील बाकी होते सदर बिल व्याज माफी करून पुर्ण रक्कम काल अदा केली आहे.
श्रीमती माधुरी मडके.मुख्याधिकारी नगरपंचायत तळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा