तळा-(किशोर पितळे)
शाळेतील मुलींना पॉर्न व्हिडीओ पाठवणार्या एका तरुणाला तळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एक मुलीने तक्रार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या घटनेमुळे तळा शहरात पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. शाळेतील मुलींना अज्ञात नंबरवरुन व्हॉट्सअपवर अश्लिल व्हिडीओ क्लिप पाठवण्यात येत होत्या. वारंवार हा प्रकार घडत असल्यामुळे एका मुलीने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली. त्यामुळे तिच्या घरच्यांनी ६ मार्च रोजी तळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्या दिवसापासून पोलीस अज्ञात इसमाच्या शोधात होते व्हॉट्सअपद्वारे क्लिप पाठवलेली असली तरी ती पाठवताना कुठलेही सिमकार्ड वापरले नव्हते.त्यामुळे शोध घेण्यात पोलिसांना तांत्रिक अडचणी येत होत्या.मोबाईलचे लोकेशन तळेगांंव आणि तळा बाजारपेठ बळीचा नाका असे दिसत होते.याच लोकेशनचा आधार घेत रविवारी रात्री पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.अटक असलेल्या तरुणाचे तळा बाजारपेठेत मोबाईल दुरुस्ती तसेच मोबाईल रिचार्जचे दुकान आहे. त्यामुळे दुरुस्ती आणि रिचार्जला आलेल्या मुलींचे मोबाईल नंबरत्यालासहज मिळत होते.याचागैरफायदा घेऊन तो मुलींना हेरून त्यांना अश्लिल व्हिडीओ पाठवत असे.अश्लिल व्हिडीओ पाठवत असताना त्याने एक व्हॉट्सअपवर खोटे खाते तयार केले होते आणि त्यावर डीपी म्हणून मुलीचा फोटो ठेवला होता. वारंवार मुलींना अश्लिल व्हिडीओ येत असल्याने एका मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगितला.याबाबत तळा पोलीस ठाण्यात गु.र.न. भा.द.वि.क.३५४डी, ३५४ (डी),१(२),५००,५०९ माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००(२००८ चे सुधारणेसह) ६६(सी), ६७,६७(ए) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास तळा पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खराडे, पोलीस हवालदार सर्णेकर, पोलीस हवालदार पवार आणि गोपनीय कामकाज पाहणारे पोलीस शिपाई विष्णू तिडके करीत आहेत.
Post a Comment