जीवघेण्या या खड्याला जबाबदार कोण?नगरपंचायत प्रशासन कि ठेकेदार ?पादचाऱ्याचा संतप्त सवाल.
तळा किशोर पितळे.
तळा नगरपंचायतीनी २०१९/२०सालात संपूर्ण शहरातील रस्ते बंदिस्त गटारे करण्याचे काम गेले कित्येक वर्षे एकाच ठेकेदाराला देण्याचा ठेकाच घेतलेला असून रस्ते, गटार यांची कामे निष्कृष्ठ दर्जाची झालेली असलेल्याचे वृतपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली होती.तरी देखील नगरपंचायत प्रशासनाने
ठेकेदारावर काहीचअँक्शन घेतलेलीनाही.याठेकेदाराने बिल मात्र काढून घेतलीआहेत.शहरातील सोनारआळी तील रस्ता व मोरीचे काम झाल्यावर महीन्याभराचे आत भला मोठा जीवघेणा खड्डा निर्माण झाला आहे. हा सतत वाहतूकीचा एकमेव रस्ता असून शाळा काँलेज प्राथमिकशाळाआरोग्यकेंद्रआहेत.फोंडलवाडी भोईरवाडी,मुंढेचीवाडी मेटमोहल्ला भागाकडे जाणारा रस्ताअसून अनेक प्रकारची जड अवजड वाहने जात असतात.एक वयोवृद्ध ईसमाला पावसाळ्यात खड्ड्यात पाय पडून दुखापत झाली होती.गेल्या पावसाळ्यात या मोरीमध्ये घनकचरा अडकून पाणी रस्त्यावरून जात होते.या रस्त्यावरून दोन, तीन नगरसेवकांची सतत वर्दळ असते मग हि वस्तूस्थीती
का बरे लक्षात येऊ नये?का जाणून बुजून दुर्लक्ष केला जात आहे.या खड्डयाने मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन लक्ष देईन का?असे संतप्तसूरपादचाऱ्याकडून
ऐकायला येत आहे आता तरी नगरपंचायत प्रशासन लक्ष घालील का?असा सवाल नागरिकांन मधून केला जात आहे.
Post a Comment