पाष्टी येथे झाला सुंदर उपक्रम ; सुंदर हस्ताक्षर लेखन
महा .अ.नि.स म्हसळा चा अनोखा उपक्रम
टीम म्हसळा लाईव्ह
आज माध्यमिक शाळा पाष्टी येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ता म्हसळा यांचे वतीने सुलेखन हस्ताक्षर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या शिबिराला मार्गदर्शक तज्ञ शिक्षक आदरणीय तोडनकर सर उपस्थित झाले यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी आपले हस्ताक्षर कसे सुधारावे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने बोर्डाचे पेपर लिहावे याविषयी मार्गदर्शन केले . विविध आकृत्या अगदी सेक॑दामधये कश्या काढाव्यात यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले . एकाच वेळी दोन्ही हाताने लिखाण करून दाखवले त्याच बरोबर म्हसळा अ .नि .स. चे प्रधान सचीव रुपेश गमरे यांनी देखील विद्यार्थीनी संवाद साधत मार्गदर्शन केले .
सदर प्रसगी पाष्टी हायस्कूल मधून 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला 5000 रुपये रोख पारितोषिक देण्याचे गमरे सर यांनी जाहीर केले तसेच म्हसळा अ नि स. अध्यक्ष नवाज नजीर यांनी देखील शाळेतील प्रथम तीन विद्यार्थी यांना पारितोषिक जाहीर केले.
सदर कार्यशाळेला रा.जी.प.शाळा मा॑दाटणे . घाणेरी को॑ड येथील शिक्षक गायकवाड सर व माऊली सर विद्यार्थी सह उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी अ.नि. स .म्हसळा शाखा यांचे अध्यक्ष नवाज नजीर , उपाध्यक्ष प्रा. भोसले के.एस .कार्याध्यक्ष जयसिंग बेटकर, प्रधान सचीव रुपेश गमरे , युवा कार्यकर्ते सिध्दांत शिंदे , सामाजीक कार्यकर्ते अनिल बांद्रे , माध्यमिक शाळा पाष्टी चे स्थानिक चेअरमन शांताराम कांबळे , माजी सरपंच राजाराम धुमाळ , जगजीवन लाड , सरपंच चंद्रकांत पवार तसेच शाळेतील शिक्षक प्रफुल्ल पाटील, बिलाल शिकलगार , ललित पाटील , विनयकुमार सोनवणे, लेखणीक संदीप दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा म्हसळा या शाखेचे अध्यक्ष श्री नवाज जी नजिर साहेब यांनी सांगितले आहे की ईयत्ता दहावी च्या होणार्या परिक्षेत
प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक
येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव श्री रूपेश जी गमरे सर यांच्या तर्फे जे विद्यार्थी ९०% च्या वर टक्केवारी प्राप्त करतील त्या प्रत्येकी विद्यार्थ्यांला ५०००/- (पाच हजार) बक्षिस दिले जाईल अशी माहिती महा .अ.नि.स म्हसळा तर्फे जाहीर करण्यात आली.
महा. अ॑.नि स .जिल्हा पदाधिकारी विनयकुमार सोनवणे सर यांच्या सुंदर सूत्रसंचलनाने कार्यक्रमाला उंची आणली तर जेष्ठ शिक्षक प्रफुल्ल पाटील. यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले .
Post a Comment