तब्बल १२ दिवसानंतर म्हसळा ग्रामिण रुग्णालयात लसीकरण मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणाला झाली सुरवात


तब्बल १२ दिवसानंतर म्हसळा ग्रामिण रुग्णालयात लसीकरण मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यातील (Corona Vaccination Drive) लसीकरणाला झाली सुरवात.

संजय खांबेटे : म्हसळा 
संपूर्ण देशासह राज्यातील सर्व जिल्ह्याचे तालुक्यांतून
लसीकरण मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यात (Corona Vaccination Drive) 60 वर्षांवरील वयोवृद्ध आणि 45 ते 59 वर्षांच्या दरम्यान ज्यांना गंभीर आजार आहेत, त्यांना १ मार्च२०२१ पासून सर्व ग्रामिण,उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयांतून कोविड लस दिली जात आहे. परंतु म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत तब्बल १२ दिवसानंतर आज जनतेच्या आग्रही मागणीनुसार लसीकरणाला प्रारंभ झाला.स्थानिक जनतेतर्फे तालुका शिवसेना प्रमुख तथा तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे, उदय कळस बाबू शिर्कें,खारगाव सरपंच अनंत नाक्ती, खरसई सरपंच निलेश मंदाडकर,विठोबा पवार, कांतीलाल जैन, रवी जोशी,यानी जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. महेश मेहता, कार्यालयीन सहा.अधिक्षक विष्णू संबारे, आर्थ परिचारक श्रीमती शितल लहानू लेंडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ममता मोरे यांना पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद दिले.

"संपूर्ण तालुक्यातील २३ विभागाची मुख्यालये म्हसळा शहरांत आहेत.तालुक्या तील प्रत्येक नागरिका ग्रामिण रुग्णालयांतून मिळणारी सोय लाभाची ठरणार आहे."
-महादेव पाटील, तालुका प्रमुख शिवसेना तथा अध्यक्ष हिंदू समाज म्हसळा तालुका.

" तालुक्यांतील ४५ ते ६० वयोगटातील ज्या व्यक्तींना गंभीर आजार आहेत त्यांना नोंदणीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज असेल.गंभीर आजारांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंड आणि फुप्फुसांशी संबंधित २० गंभीर आजारांचा (को-मॉर्बिडिटी ज) समावेश आहे.६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी केवळ आधारकार्ड किंवा मतदान कार्ड हे ओळखपत्र आवश्यक रहाणार आहे. लाभार्थी ना सकाळी ९ ते सायं.५ वाजेपर्यंत कोविड लस दिली जाणार आहे."
डॉ.महेश मेहता,वैद्यकिय अधिकारी

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा