टीम म्हसळा लाईव्ह
मनपा निवडणूका समोर ठेवत व मनसेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमीत्त आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहना नुसार 14 मार्च रोजी स्वत: राज ठाकरे यांनी सकाळी 11 च्या सुमारास प्राथमिक सदस्यत्व घेऊन सदस्य नोंदणी अभियनास http://mnsnondani.in या वेबसाईट द्वारे नोंदणी करत प्रारंभ केला.
पण दुपारी एकच्या सुमारास म्हणजेच अवघ्या 2 तासात ऑनलाइन सदस्य नोंदणी साईट चा सर्वर डाऊन झाला, मनसेच्या नेत्यांनी कळविल्या प्रमाणे पहील्या एका तासात सुमारे 3 लाख च्या वर नोंदणी झाल्याचे सांगितले. नंतर पुन्हा सर्वर सुरु झाला दुपारी तीन पर्यंत सुमारे 5 लाख सदस्य नोंदणी झाल्याचे कळाले. दुपारी साडेतीन नंतर मनसे ने साईट वरुन अधिकृत रित्या सदस्य नोंदणीच थांबविल्याचे कळविले, लवकरच वेबसाईट पुन्हा सुरु होईल असे कळविले. एकुणच राज ठाकरे यांच्या या सदस्य नोंदणीला तुफान प्रतिसाद मिळत आहे असे दिसून येत आहे त्यामुळेच सर्वर डाऊन असल्याचे बोलले जात आहे. तसेच ज्या ठिकानी निर्बंध, लॉकडाऊन नाही अशा ठिकाणी मनसेने सदस्य नोंदणी करिता कार्यक्रम देखील आयोजीत केले असल्याचे कळविले.
Post a Comment